मासिक पाळीत Menstrual cup वापराने ठरेल धोक्याचे! आरोग्यासंबंधित उद्भवतील 'या' गंभीर समस्या
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये मेन्स्ट्रुअल कप वारंवार स्वच्छ न केल्यास संसर्ग वाढण्याचा धोका असतो. शरीरात वाढलेले छोटे मोठे संसर्ग पुढे जाऊन मोठ्या आजाराचे कारण बनतात. कप बराच काळ न धुतल्यास बॅक्टेरिया किंवा बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतात.
काही महिलांना सिलिकॉन, लेटेक्स किंवा रबरची अॅलर्जी होण्याची शक्यता असते. यामुळे योनीतून जळजळ, खाज सुटणे किंवा पुरळ उठणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात.
टॉक्सिक शॉक सिंड्रोम हा गंभीर आजार महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येतो. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये वापरलेला कप घरात ठेवल्याने त्यातील विषारी घटक बाहेर पडतात. ज्यामुळे ताप, उलट्या, चक्कर येणे आणि अशक्तपणा त्यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
मासिक पाळीत बरच वेळ कप घातल्यामुळे महिला वारंवार लघवी होण्याची किंवा थोडासा दाब जाणवण्याची नेहमीच तक्रार करतात. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये कप सतत बदलणे आवश्यक आहे.
मासिक पाळीमध्ये कप वापरल्यामुळे योनीमार्गात कोरडेपणा जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे कपच्या आकार योग्य नसल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात.