Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Udayanraje Bhosle : “आमच्यावर प्रेम करणा-या कोणत्याही व्यक्तीने..! खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय

खासदार उदयनराजे भोसले यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन वाढदिवस साजरा न करण्याचा विचार जाहीर केला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 09, 2026 | 12:27 PM
MP Udayanraje Bhosale decided not to celebrate birthday due to Ajit Pawar death satara news

MP Udayanraje Bhosale decided not to celebrate birthday due to Ajit Pawar death satara news

Follow Us
Close
Follow Us:
  • खासदार उदयनराजे भोसले यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
  • अजित पवारांच्या निधनामुळे खासदार भोसलेंचा निर्णय
  • सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती
Udayanraje Bhosle : सातारा : दिवंगत नेते अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. अजित पवारांच्या (Ajit Pawar) आकस्मित जाण्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यामुळे राजकीय नेत्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी देखील वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

खासदार उदयनराजे भोसले यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन वाढदिवस साजरा न करण्याचा विचार जाहीर केला आहे. तसेच दिवंगत नेते अजित पवारांबाबत त्यांच्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. उदयनराजे भोसले यांनी लिहिले आहे की, “आमचे मित्र आणि महाराष्ट्राचा लोकनेता ना.अजितदादा अनंतरावव पवार यांचे अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे नुकतेच निधन झाले, त्यांच्या वियोगाचे दु:खातुन महाराष्ट्र अजुन सावरलेला नाही. म्हणूनच दिनांक 24 फेब्रूवारी 2026 रोजी आमचा येणारा वाढदिवस आम्ही साजरा करणार नाही याची तमाम नागरिकांनी नोंद घ्यावी,” असे त्यांनी लिहिले आहे.

हे देखील वाचा : Eknath Shinde Birthday : गेमचेंजर शिंदे! रिक्षावाला ते मुख्यमंत्री थक्क करणारा राजकीय प्रवास

पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीअजितदादा पवार यांचे नुकतेच दुदैवी विमान अपघातात दु:खद निधन झाले. उभा महाराष्ट्र, हळहळला. एक हरहुन्नरी आणि सडेतोड स्वभावाचे धडाडीचे नेतृत्व काळाने आपल्यातुन हिरावून नेले. मन पिळवटुन टाकणारी ही घटना, जबर धक्का देणारी ठरली. आज आपल्यात अजितदादा नाहीत ही कल्पनाच महाराष्ट्रवासियांना करवत नाही, अजुनही विश्वास बसत नाही. स्व.अजितदादांचे आणि आमचे ऋणानुबंध काही वेगळेच होते. महाविदयालयीन जीवनातील आमची झालेली ओळख आणि पुढे त्या ओळखीचे मैत्रीत रुपांतर कधी झाले हे आम्हालाही कळले नाही,” अशी आठवण उदयनराजे यांनी सांगितली.

आमचे मित्र आणि महाराष्ट्राचा लोकनेता ना.अजितदादा अनंतरावव पवार यांचे अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे नुकतेच निधन झाले, त्यांच्या वियोगाचे दु:खातुन महाराष्ट्र अजुन सावरलेला नाही. म्हणूनच दिनांक 24 फेब्रूवारी 2026 रोजी आमचा येणारा वाढदिवस आम्ही साजरा करणार नाही याची तमाम नागरिकांनी… pic.twitter.com/hvC4yCgcpG — Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 8, 2026

पुढे त्यांनी लिहिले आहे की, “अतिशय दिलदार मनाचा हा मोठा माणूस, महाराष्ट्राला कामाचा माणूस म्हणून ओळखत होता. आमची मैत्री होतीच तथापि त्याला वेगवेगळी कारणे होती. मैत्रीतही आमचे वैचारिक मतभेद होते परंतु मनभेद नव्हते. लक्ष साधण्याचे मार्ग कदाचित वेगळे असतील परंतु आमचे लक्ष एक होते. सांगण्यासारख्या खूप आठवणी आहेत. तथापि शब्द सूचत नाहीत. आमच्याच नव्हे तर दादांवर प्रेम असणा-या प्रत्येक माणसाचा आजच्या मानसिकतेचा विचार करुन, आमचा येणारा 24 फेब्रूवारी 2026 रोजीचा वाढदिवस आम्ही साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे.

हे देखील वाचा : साताऱ्यात भाजप आघाडीवर तर राष्ट्रवादी 14 जागांवर…; अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

“अजितदादांच्या जाण्यामुळे दादांचे कुटुंब आणि महाराष्ट्रातील जनता सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. दु:ख प्रचंड आहे, मित्राची अकाली एक्झीट आमच्या जीवाला चटका लावणारी आहे. म्हणूनच आम्ही आमचा वाढदिवस साजरा करणार नाही. सातारा जिल्हयातील, महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील आमच्यावर प्रेम करणा-या कोणत्याही व्यक्तीने, कार्यकर्त्यांनी, जनतेने आमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन करु नये. कोणास सामाजसेवा म्हणून काही करण्याचे असल्यास त्यास आमच्या वाढदिवसाचे निमित्त करु नये किंवा त्याची कोणताीही प्रसिध्दी किंवा गाजावाजा करु नये असे आमचे आवाहन आहे. अजितदादांच्या निधनामुळे आमची आंतरिक तगमग/घालमेल, समजुन घेवून आमचे सर्व स्नेही, कार्यकर्ते, व्यक्ती आणि तमाम नागरिक वाढदिवस साजरा न करण्याच्या निर्णयाची जरुर ती नोंद घेवून आमच्या भावना समजून घेतील असा विश्वास आहे,” असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी समर्थक आणि कार्यकर्त्यांना केले आहे.

Web Title: Mp udayanraje bhosale decided not to celebrate birthday due to ajit pawar death satara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • ajit pawar
  • MP Udayanraje Bhosle
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara Zp Election Result : साताऱ्याच्या ‘मिनी मंत्रालय’वर कुणाची सत्ता? भाजपची लाट रोखणार का राष्ट्रवादी?
1

Satara Zp Election Result : साताऱ्याच्या ‘मिनी मंत्रालय’वर कुणाची सत्ता? भाजपची लाट रोखणार का राष्ट्रवादी?

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस ठरतायेत किंगमेकर! शरद पवारांना प्रत्येक पावलावर देतायेत टक्कर
2

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस ठरतायेत किंगमेकर! शरद पवारांना प्रत्येक पावलावर देतायेत टक्कर

अजित पवारांच्या विमान अपघातावर शंका, ब्लॅकबॉक्स मधील संभाषण…; काँग्रेसचा सवाल
3

अजित पवारांच्या विमान अपघातावर शंका, ब्लॅकबॉक्स मधील संभाषण…; काँग्रेसचा सवाल

Sudhakar Ghare : “अजितदादांसारखा ‘दादा’ महाराष्ट्राला पुन्हा मिळणे शक्य नाही”, अस्थिकलशाच्या दर्शनाला कर्जतची जनता लोटली
4

Sudhakar Ghare : “अजितदादांसारखा ‘दादा’ महाराष्ट्राला पुन्हा मिळणे शक्य नाही”, अस्थिकलशाच्या दर्शनाला कर्जतची जनता लोटली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.