हिरव्या रंगाच्या साडीवर परिधान करा 'या' रंगाचे ब्लॉऊज
हिरव्या रंगाच्या साडीवर तुम्ही डार्क गुलाबी रंगाचा ब्लॉऊज परिधान करू शकता. गुलाबी रंग सर्वच साड्यांवर खूप खुलून दिसतो.
काठापदराच्या किंवा हिरव्या रंगाच्या पैठणी साडीवर हिरव्या रंगाचा बॉर्डर असलेला ब्लॉऊज परिधान करू शकता. यामुळे तुमचा लुक खूप उठावदार आणि हेवी दिसेल.
कॉटनमध्ये किंवा सिफॉनमध्ये हिरव्या रंगाची साडी नेसल्यावर कॉटनचा रंगीत ब्लॉऊज परिधान करू शकता. हा लुक सिंपल आणि सुंदर दिसेल.
हिरव्या रंगाचा साडीवर तुम्ही पिवळा, मस्टर्ड येलो किंवा डार्क पिवळ्या रंगाचा ब्लॉऊज घालू शकता.
हिरव्या रंगाची बनारसी किंवा कांजीवरम सिल्क साडी नेसल्यानंतर तुम्ही लाल रंगाचा ब्लॉऊज घालू शकता.