लग्नातील रिसेप्शनमध्ये ग्लॅमर लुकसाठी परिधान Indo-Western Lehenga
लग्नात जॅकेट स्टाईल लेहेंगा परिधान केल्यास उठावदार आणि स्टायलिश लुक दिसेल. जॅकेट स्टाईल लेहेंग्यावर केलेले बारीक बारीक मण्यांचे नक्षीकाम लुकची शोभा वाढवेल.
रिसेप्शनमध्ये तुम्ही भरतकाम केलेला सुंदर स्कर्ट आणि त्यावर टीशर्ट किंवा टॉप घालून सुंदर लुक स्टाईल करू शकता. यामुळे तुमचा लुक स्टायलिश दिसेल.
फ्लेअर्ड पलाझो क्रॉप टॉप किंवा शॉर्ट कुर्ता असलेल्या लेहेंग्याची सोशल मीडियावर मोठी क्रेझ आहे. या डिझाईनची लेहेंगा तुम्ही हळदी सोहळ्यात सुद्धा घालू शकता.
काहींना लग्नात स्टायलिश आणि रॉयल लुक हवा असतो. या लुकसाठी भरीव नक्षीकाम आणि वेगवेगळ्या मण्यांचा वापर केला जातो.
बनारसी साडी किंवा शॉफन फॅब्रिकचा लेहेंगा तुमच्या सौंदर्यात भर पडेल. यावर मोत्याचे किंवा सोन्याचे दागिने अतिशय सुंदर दिसतात.