कॉटनच्या साडीवर परिधान करा 'या' गळ्याचे सुंदर ब्लाऊज
ऑफिस लुकमध्ये अतिशय क्लासी आणि स्टयलिश लुक हवा असेल तर तुम्ही या पद्धतीचा नॉट असलेला ब्लाऊज शिवून घेऊ शकता. पाठीमागे तुम्ही ब्लाऊजच्या कपड्यापासून बनवलेले लटकन देखील वापरू शकता.
उन्हाळ्यात कॉटनची साडी नेसल्यानंतर त्यावर तुम्ही या पद्धतीचा मोठा गळा असलेला ब्लाऊज शिवून घेऊ शकता. मोठ्या गळ्याचे ब्लाऊज परिधान करायला सगळ्यांचं खूप आवडतात.
अनेक महिला मोठ्या गळ्याचे ब्लाऊज घालायला आवडत नाही. अशा महिलांसाठी हा ब्लाऊज अतिशय उत्तम आहे. यामध्ये तुम्ही तुम्हाला हवा तेवढा पाठीमागील गळा ठेवू शकता.
हल्ली ब्लाऊजच्या एकाच बाजूला नॉट बनवून घेता येतात. या पद्धतीचा ब्लाऊज ऑफिस लुकमध्ये तुमची शोभा वाढवेल.
व्ही शेपमध्ये शिवलेले ब्लाऊज अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतात. त्यामुळे रोजच्या वापरातील साड्यांवर तुम्ही या पद्धतीचे साधे ब्लाऊज शिवून घेऊ शकता.