ब्लू झोनमधील लोक 100 वर्षांपेक्षा अधिक जगतात. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटते की नक्की या झोनमधील लोक खातात तरी काय? यासाठी आपण आज या फोटोगॅलरीमधून जाणून घेऊया
ब्लू झोनमध्ये हंगामी आणि ताजी फळे आणि भाज्यांचे नियमित सेवन केले जाते. विशेषतः हिरव्या पालेभाज्या, गाजर, सोयाबीन, टोमॅटो, वांगी यांसारख्या भाज्या खाल्ल्या जातात. तुम्हीही याचे सेवन नियमित करावे आणि ऑर्गेनिक फळभाज्यांचा वापर करावा
राजमा, चणे, मूग आणि विविध कडधान्ये हे प्रथिने आणि फायबरचे मुख्य स्त्रोत आहेत. डाळी आणि कडधान्ये हे 20-25% आहार समाविष्ट करतात. त्यामुळे आपल्या जेवणात याचा समावेश करून घ्यावा
अक्रोड, बदाम, सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया यासारखे नट नियमितपणे खाल्ले जातात. हृदयाच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर आहेत. तुम्ही तुमच्या आहारात नियमितपणे याचा समावेश करून घेणे उपयुक्त ठरू शकते
हर्बल टी, मर्यादित प्रमाणात रेड वाईन आणि पाणी भरपूर प्रमाणात ब्लू झोनमध्ये वापरले जाते. याव्यतिरिक्त, दही सारखे प्रोबायोटिक पदार्थ आणि मिसो आणि टेम्पेहसारखे आंबवलेले पदार्थ पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात
ऑलिव्ह ऑइल हे ब्लू झोनमध्ये चांगल्या चरबीचे प्रमुख स्त्रोत आहे, जे हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते. ओकिनावा आणि सार्डिनिया सारख्या भागात, लहान मासे खाल्ले जातात, ज्यात ओमेगा -3 फॅटी अॅसिड भरपूर असतात
ओट्स, बाजरी, बार्ली आणि तपकिरी तांदूळ जो आपल्या कोकणात अधिक प्रमाणात मिळतो यांसारखी संपूर्ण धान्ये वापरली जातात. हा फायबर आणि ऊर्जेचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे यासारख्या अख्ख्या धान्याचा वापर करावा