जगात पहिल्यांदा पास्त्याचा शोध कधी आणि कोणी लावला? आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या पास्त्याची रंजक कहाणी
आवडीने खाल्लेल्या पास्त्याची कथा प्राचीन इटली, अरब जग आणि भूमध्यसागरीय व्यापार मार्गांपर्यंत पसरलेली आहे. पास्ताला आधुनिक स्वरूप देणारा देश म्हणून इटली ओळखला जातो.
इटलीमध्ये रोजच्या आहारात प्रामुख्याने पास्त्याचे सेवन केले जाते. त्यांच्या आहारात पास्ता, नूडस्ल्स इत्यादी पदार्थ प्रामुख्याने असतात. पाचव्या शतकाच्या आसपास अरब लोक वाळलेला, सुकलेला पास्ता बनवून खायचे.
नव्या शतकात ज्यावेळी अरब शासक सिसिलीमध्ये आले होते तेव्हा वाळलेला पास्ता बनवण्याची नवीन प्रक्रिया त्यांनी शिकवली. त्यानंतर इटालियन लोकांनी त्यात आणखीन सुधारून करून पास्ता तयार करा.
13 व्या शतकात मार्को पोलोने चीनमधून पास्ता आणला होता. त्यानंतर मार्को पोलो आशियातून परतण्यापूर्वी इटालियन लोक पास्ता खात होते. पास्ता बनवताना त्यात वेगवेगळ्या भाज्या सुद्धा टाकल्या जातात.
17 व्या शतकात नेपल्स ने पास्त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले होते. पास्ता हा पदार्थ अतिशय स्वस्त पोटभर आणि टिकाऊ पदार्थ असल्यामुळे स्थानिक कामगार मोठ्या प्रमाणावर पास्ता खरेदी करायचे.