India vs England कसोटी मालिकेत सर्वाधिक षटके टाकणारे टॉप 5 वेगवान गोलंदाज कोणते?
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक षटके टाकणारा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स आहे, ज्याने आतापर्यंत चारही सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये त्याने १६७ षटके टाकली आहेत. फोटो सौजन्य - ICC
दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्रायडन कार्सेपेक्षा १२ षटके जास्त आहे. ब्रायडन कार्सेने आतापर्यंत ४ सामन्यांमध्ये १५५ षटके टाकली आहेत. पण तो संघासाठी फार काही प्रभावशाली खेळी खेळण्यात अपयशी ठरला आहे. फोटो सौजन्य - X
बेन स्टोक्सने या चार सामन्यांमध्ये १४० षटके टाकली आहेत. बेन स्टोक्स आतापर्यत कर्णधार म्हणुन आणि गोलंदाज म्हणुन खुप चांगली कामगिरी केली आहे. बेन स्टोक्सने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ४ सामन्यांमध्ये १७ विकेट्स घेतल्या आहेत. फोटो सौजन्य - X
यादीत चौथे नाव मोहम्मद सिराजचे आहे, ज्याने १३९ षटके टाकली आहेत. मोहम्मद सिराजनेही आतापर्यत 14 विकेट्स घेतल्या आहेत. सिराजने संघासाठी आतापर्यत चारही सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली आहे. फोटो सौजन्य - BCCI
पाचव्या क्रमांकावर असलेल्या जसप्रीत बुमराहने ३ सामन्यांमध्ये ११९ षटके टाकली आहेत. सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह आहे, ज्याने १४ विकेट्स घेतल्या आहेत. फोटो सौजन्य - BCCI