Balasaheb Thackeray's wife Meenatai Thackeray Marathi information political news
मीनाताई ठाकरे या शिवसेनाप्रमुख आणि हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी होत्या. 13 जून 1948 रोजी मीनाताई आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विवाह झाला होता.
मीनाताई ठाकरे यांचे लग्नापूर्वीचे नाव सरला वैद्य असे होते. मीनाताई ठाकरे यांचा वाढदिवस 6 जानेवारी हा शिवसैनिकांकडून ममता दिन म्हणून साजरा केला जातो. बाळासाहेबांच्या पत्नी असलेल्या मीनाताई यांनी शिवसैनिकांवर आईप्रमाणे माया केली. त्यामुळे शिवसैनिकांसाठी त्या पूजनीय आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांच्या चढउतार असलेल्या राजकीय आयुष्यामध्ये मीनाताई त्यांच्या पाठीशी खंबीर उभ्या होत्या. ठाकरे कुटुंबाला एकत्र ठेवण्यामध्ये आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामागे संसार सांभाळण्यामध्ये मीनाताई ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांना तीन मुले आहेत. सर्वात मोठे बिंदूमाधव, त्यानंतर जयदेव आणि सर्वात लहान उद्धव ठाकरे आहेत.
राज ठाकरे यांचे मीनाताई ठाकरेंशी खास नाते होते. राज त्यांना मॉंसाहेब म्हणत असत. लहानपणापासून त्यांनी राज ठाकरेंना खूप जीव लावला होता. राज ठाकरे हे अनेकदा आपल्या मुलाखतींमध्ये मॉसाहेंबाच्या आठवणी सांगत असतात.
मीनाताई ठाकरे यांच्या बहिणी कुंदा ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांच्याशी विवाह झाला होता. राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत शिंदे आहेत. त्यामुळे मीनाताई ठाकरे या राज ठाकरेंच्या मावशी आणि काकी दोन्ही होत्या.
मीनाताई ठाकरे यांचा 6 सप्टेंबर 1995 रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाळासाहेब ठाकरे यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला मीनाताई ठाकरे यांचा अचानक सोडून जाणे अत्यंत धक्कादायक होते.