वटवाघूळ झाडाला कायमच उलटी लटकलेली का असतात?
वटवाघळांचे मागचे पाय खूप लहान असतात आणि त्यांच्या पायांचा विकास होत नाही. त्यामुळे वटवाघूळ जमीनीवर उभे राहू शकत नाहीत. याशिवाय इतर पक्षांप्रमाणे धावून उड्डाणासाठी लागणारा वेग पकडू शकत नाहीत.
उलट लटकणे ही स्थिती वटवाघुळांसाठी अतिशय आरामदायी मानली जाते. याशिवाय त्यांना कोणत्याही स्नायूंची ताकद वापरावी लगत नाही. वटवाघुळांच्या शरीराचे वजन त्यांचे पंजे घट्ट धरून ठेवण्यास मदत करतात.
वटवाघळांच्या पायात विशिष्ट स्नायूंचे बंध असते. ते जेव्हा एखाद्या फांदीला पडकून ठेवतात, त्यावेळी शरीराच्या वजनामुळे पंज्याचे लॉक आपोआप बंद होते. यामुळे ते गाढ झोपेत असल्यानंतर सुद्धा ते खाली पडत नाहीत.
वटवाघूळ प्रामुख्याने झाडांवर किंवा गुहांमध्ये पाहायला मिळतात. याशिवाय झाडाच्या फांदीवर वटवाघूळ कायमच उलटी लटकलेली असतात.
वटवाघूळ असलेल्या ठिकाणी साप किंवा इतर सरपटणारे प्राणी येत नाहीत. काहीवेळा वटवाघूळ घराच्या अवतीभोवती किंवा इतर ठिकाणी फिरताना पाहायला मिळतात.