भारतीय महिला कपाळावर टिकली का लावतात?
आधुनिक जगात महिला टिकली केवळ सुंदर दिसण्यासाठी नाहीतर संस्कृती जपण्यासाठी सुद्धा टिकली लावतात. टिकली आंतरराष्ट्रीय कलाकार आणि फॅशन आयकॉन आहे.
सुंदर मेकअप, दागिने,हेअर स्टाईल केल्यानंतर लुक पूर्ण करण्यासाठी टिकली लावली जाते. महिलांचे कपाळ कधीही मोकळे असू असे नये असे बऱ्याचदा म्हंटले जाते. त्यामुळे महिला कायमच कपाळावर टिकली लावतात.
भारतीय संस्कृतीमध्ये टिकली या शब्दाला विशेष महत्व आहे. टिकलीचा संबंध 'तिसऱ्या डोळ्या'शी जोडला जातो, जो ज्ञान आणि अंतर्ज्ञानाचे प्रमुख केंद्र आहे. टिकली म्हणजे देवी-देवतांशी आणि आंतरिक शक्तीशी असलेल्या संबंधाचे प्रतीक आहे.
महिला कायमच दोन भुवयांच्या मध्यभागी टिकली लावतात. कपाळावर टिकली लावल्यामुळे महिलांना सकारात्मक ऊर्जा मिळते. याशिवाय आरोग्यावर सुद्धा चांगले परिणाम दिसून येतात.
ड्रेस, साडी किंवा इतर सर्वच कपड्यांवर टिकली लावली जाते. विवाहित महिला प्रामुख्याने लाल टिकली लावतात. ही टिकली शुभ, प्रेम, सौभाग्य आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते.