घाणेरड्या चहागाळणीत दडलेत हजारो जंतू, काळाकुट्ट थर लगेच होईल दूर... मिळेल नव्यासारखी चकाकी; फक्त हा 2 रुपयांचा उपाय करा
स्वयंपाकघरात नियमित आणि दररोज वापरल्या जाणाऱ्या भांड्यांमध्ये चहागाळणीचा प्रामुख्याने समावेश होतो. अनेकांच्या सकाळची सुरुवात चहागाळणीने वापराने होत असते. सर्वांची आवडती मोरींनींग मॉर्निंग ड्रिंक चहा गाळण्यासाठी याचा वापर केला जातो. आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला याची फार मदत होते पण या गाळणीला जर आपण नीट स्वछ केले नाही तर काळाबरोबरच ती हळूहळू खराब होऊ लागते आणि त्यावर घाणीचा थर जमा होऊ लागतो. चहाची पाने आणि जाळीत अडकलेली घाण केवळ गाळणी खराब करत नाही तर तुमच्या आरोग्यावरही परिणाम करू शकते.
बऱ्याचदा आपली गाळणी फार खराब झाली की मग त्यावर साचलेला काळा जंतुयुक्त थर दूर करताना फार त्रास होतो आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी चहागाळण साफ करण्यासाठीची एक सोपी आणि अनोखी ट्रिक घेऊन आलो आहोत. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही सहज, कोणतीही मेहनत न घेता चहागाळणीला स्वछ करू शकता. हा उपाय जुन्या चहागाळणीला नव्यासारखी चकाकी देण्यास मदत करेल. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
स्टीलची चहागाळणी अशी करा साफ
जर तुमच्या घरी स्टीलची चहागाळणी असेल, तर ती गॅसच्या आचेवर जाळीची बाजू काही सेकंदांसाठी वर करून ठेवा. जाळीवरील पाने जळू लागताच आणि चाळणी लाल होऊ लागताच, गॅस बंद करा. थोडा वेळ थंड झाल्यावर, स्क्रबरने हलक्या हाताने गाळणीला स्वछ करा. असं करताच तुम्हाला दिसेल की, गाळणीत साचलेली सर्व काळी घाण पाण्यासोबत बाहेर पडत आहे. याने तुमची स्टीलची चाळणी पुन्हा नवीनसारखी चमकेल.
प्लास्टिक गाळणी कशी स्वच्छ करावी
तुम्ही गॅसवर प्लास्टिकची चाळणी ठेवू शकत नाही, पण ती स्वच्छ करणे सोपे आहे. यासाठी टूथब्रशवर डिशवॉशिंग साबण आणि बेकिंग सोडा लावा आणि गाळणीच्या छिद्रांवर चांगले लावा. काही मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर स्कॉचच्या मदतीने चहागाळणीला स्वछ करा . यामुळे छिद्रांमध्ये अडकलेली पाने आणि घाण लगेच निघून जाईल.
लिंबू आणि बेकिंग सोडा वापरा
जर तुमची चाळणी खूप घाणेरडी झाली असेल, तर तुम्ही घरात उपलब्ध असलेल्या लिंबू, व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचा वापर करूनही तिला स्वछ करू शकता. यासाठी लिंबू, व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मिक्स केलेल्या पाण्यात गाळणीला काहीवेळ भिजवून ठेवा. यामुळे साचलेला थर सहज सैल होईल. त्यानंतर, स्टील स्क्रबर किंवा टूथब्रशने जाळी स्वच्छ करा. आठवड्यातून एकदा ही पद्धत केल्याने, तुमची चाळणी नेहमीच स्वच्छ आणि चमकदार राहील.
स्वच्छ भांडी आरोग्यासाठी आवश्यक आहेत
भांडी नीट स्वछ नसतील आणि तरीही आपल्या रोजच्या जीवनात जर तुम्ही अशा भांड्याचा वापर करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
यामुळे संसर्गाचा धोका वाढतो, म्हणून चाळणीसारखी छोटी भांडी स्वच्छ ठेवणे हे मोठी भांडी स्वच्छ ठेवण्याइतकेच महत्त्वाचे आहे. थोडेसे प्रयत्न आणि या सोप्या ट्रिक्सच्या मदतीने, तुम्ही तुमचा चहा आणखी निरोगी आणि स्वच्छ बनवू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.