महिला हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या का घालतात?
लग्न झालेल्या मुलींच्या हातात हिरव्या बांगड्या असतात. पूर्वीपासून ते आत्तापर्यंत परंपरेनुसार मुलीच्या हातात हिरव्या बांगड्याच असतात. बांगड्या हा दागिना सोळा अलंकारापैकी एक महत्वाचा दागिना आहे.
लग्न झाल्यानंतर हिरव्या बांगड्या हातामध्ये घातल्यास घरात समृद्ध आणि सुख नांदते. याशिवाय घरातील व्यक्तींचे आरोग्य निरोगी राहते.
हातामध्ये बांगड्या घातल्यामुळे हातांचे घर्षण होते, ज्यामुळे संपूर्ण शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. शरीराचा रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
मनगटावर अनेक अक्यू प्रेशर पॉईंट्स असतात. हे पॉईंटस दाबले गेल्यामुळे महिलांचे हार्मोन्स संतुलित राहतात. महिलांच्या हार्मोन्ससंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही.
हातामध्ये काचेच्या बांगड्या घातल्यामुळे महिलांपर्यंत नकारात्मक ऊर्जा येत नाही. याशिवाय मानसिक तणाव दूर करण्यासाठी हातांमध्ये रांगोबेरंगी बांगड्या घालाव्यात. यामुळे मन शांत राहते.