फोटो सौजन्य - pinterest
भारत आणि पाकिस्तान या वर्षी त्यांचा 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. भारतात 15 ऑगस्ट रोजी तर पाकिस्तानात 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना एकाच वेळी स्वातंत्र्य मिळाले, मग तरीही दोन्ही देश वेगवेगळ्या दिवशी त्यांचा स्वातंत्र्यदिन का साजरा करतात, असा प्रश्न आपल्या मनात अनेक वेळा येतो.
यामागचे कारण म्हणजे दोन्ही देशांची प्रमाणित वेळ. पाकिस्तानची मानक वेळ भारतापेक्षा ३० मिनिटे मागे आहे. जेव्हा भारतात 12 वाजलेले असतात, तेव्हा पाकिस्तानमधील घड्याळात 11.30 वाजतात.
असं सांगितलं जातं की, 14 ऑगस्टच्या रात्री ब्रिटिश सरकारने भारतीय स्वातंत्र्य कायद्यावर स्वाक्षरी केली होती, त्यावेळी भारतात रात्रीचे 12 वाजले होते. म्हणजेच भारतीय वेळेनुसार 15 ऑगस्ट ही तारीख सुरु झाली होती. पण पाकिस्तानमध्ये आदल्या दिवशीचे म्हणजेच 14 ऑगस्टचे रात्री 11.30 वाजले होते.
14 ऑगस्ट 1947 रोजी तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी पाकिस्तानला स्वतंत्र देशाचा दर्जा दिला. त्यामुळे भारतात 15 ऑगस्ट आणि पाकिस्तानात 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो.
स्वातंत्र्यानंतरची पहिली दोन वर्षे पाकिस्तान सुद्धा 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करत होता. पण मोहम्मद अली जिना यांचे निधन झाल्यावर पाकिस्तानमध्ये 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा केला जाऊ लागला.