7 तासांसाठी मृत झालेल्या महिलेने घेतला स्वर्गाचा अनुभव; परत येताच उघड केले परलोकाचे सत्य, म्हणाली तिथे...
२०१५ मध्ये, न्यू जर्सीमधील पॅलिसेड्स क्लिफ्स येथे हायकिंग करताना, एरिका घसरुन ६० फूट दरीत पडली. या भयानक अपघातात तिचा पाठीचा कणा तुटला, फासळ्या आणि हात फ्रॅक्चर झाले आणि दोन्ही फुफ्फुसे फुटली. ती ओरडत राहिली पण नेमके ठिकाण माहिती नसल्याने तिला वाचवण्यासाठी तब्बल सात तास लागले.
एरिकाला जेव्हा रुग्णालयात नेले तेव्हा डाॅक्टरांनी सांगितले की, ती क्लिनिकल डेथच्या जवळ आहे. तिने दावा केली की सात तासांच्या या कालावधीत तिने "मृत्यूनंतरचे जीवन" किंवा "स्वर्ग" असे ज्याला आपण म्हणतो त्याचा अनुभव घेतला. तिन सांगितले की, दरीत पडल्यानंतर तिने वरून तिच्या विद्रूप शरीराकडे पाहिले. तिला जाणवले की ती हे शरीर नाही तर काहीतरी वेगळेच आहे. क्षणार्धात, तिच्या सर्व वेदना नाहीशा झाल्या आणि एक खोल शांती पसरली.
एरिकाने म्हटले की, "माझे संपूर्ण आयुष्य माझ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखे फिरले," ती म्हणाली. "मला माझे भूतकाळातील निर्णय आणि मी इतरांना दिलेल्या वेदनांची जाणीव झाली".
आपण अनेकदा ऐकलं असेल की, मृत्यूनंतर यमराज आणि देवदूत आपल्याला दिसतात पण एरिकाने असा कोणताही अनुभव घेतला नाही. तिच्या मते, न्याय करण्यासाठी तिथे कोणीही नव्हते. ती फक्त एका तेजस्वी प्रकाशाकडे खेचली गेली ज्याला ती ‘यूनिवर्सल कॉन्शसनेस’ किंवा देव मानते. तिच्या मते तो प्रकाश प्रेम आणि असीम शांतीने भरलेला आहे.
एरिकाच्या मते ती आधी देवावर विश्वास ठेवत नव्हती पण या अनुभवानंतर आता ती पूर्णपणे आध्यात्मिक झाली आहे. तिचा असा विश्वास आहे की मृत्यू हा शेवट नसून तो एक भ्रम आहे. तिच्या मते, स्वर्ग आणि नरकाची चिंता न करता त्याऐवजी करुणा आणि एकतेने जगण्यास प्रोत्साहित व्हायला हव.