Tech Tips: मोबाईल डेटा ऑन असताना इंटरनेट काम करत नाही? या 5 ट्रिक्स करतील तुमची मदत
तुम्ही काही सोप्या ट्रिक्सच्या मदतीने तुमच्या स्मार्टफोन इंटरनेटची समस्या सोडवू शकता.
तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेट सर्विस डेटा रोमिंग सुरु करा. यासाठी तुम्हाला सेटिंग्स > नेटवर्क आणि कनेक्टिविटी > मोबाइल नेटवर्क > डेटा रोमिंग ही सेटिंग फॉलो करावी लागणार आहे.
अनेकदा असं होतं की आपण आपला स्मार्टफोन बऱ्याच वेळा रिस्टार्ट करत नाही. यामुळे इंटरनेटवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमचा स्मार्टफोन इंटरनेट योग्यरित्या काम करत नसेल तर फोन रिस्टार्ट करा.
स्मार्टफोनमध्ये साठलेल्या कॅश डेटामुळे इंटरनेट स्पीडवर परिणाम होऊ शकतो. यासाठी सेटिंग्स > अॅप्लिकेशन > अॅप > स्टोरेज > कॅश क्लियर ही सेटिंग फॉलो करा.
वरील ट्रिक्स फॉलो करून देखील तुमच्या स्मार्टफोनमधील इंटरनेट समस्या सुटली नसेल तर सेटिंग्स > सिस्टम > रीसेट > नेटवर्क सेटिंग्स रीसेट या स्टेप्स फॉलो करा.
जुन्या किंवा आउटडेटेड सॉफ्टवेयरमुळे देखील इंटरनेट स्पीड आणि कनेक्टिविटीवर परिणाम होऊ शकतो. सेटिंग्स > सॉफ्टवेयर अपडेट > अपडेट इंस्टॉल या स्टेप्स फॉलो करा.