Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; २४ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी

पुणे-सातारा महामार्गावरील नीरा नदी पुलाजवळ शिंदेवाडी येथे भीषण अपघात झाला. फिरण्यासाठी आलेल्या तरुणांच्या दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 12, 2025 | 04:18 PM
24-year-old woman died on the spot in Pune-Satara highway Shindewadi accident

24-year-old woman died on the spot in Pune-Satara highway Shindewadi accident

Follow Us
Close
Follow Us:

शिरवळ : पुणे-सातारा महामार्गावरील नीरा नदी पुलाजवळ शिंदेवाडी येथे भीषण अपघात झाला. या झालेल्या भीषण अपघातात २४ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि.12) घडली असून, शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत याची नोंद झाली आहे.

घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील नामांकित आयटी कंपनीत कार्यरत तीन तरुण आणि एक तरुणी महाबळेश्वरला फिरण्यासाठी दुचाकीवरून (एमएच ०१ डीजे ८३६५) निघाले होते. खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी गावाजवळील नीरा नदी पुलावर भरधाव ट्रकने (पीबी ०६ ए यु ९९९५) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रुबेल सिन्हा (वय २४) रस्त्यावर पडली, आणि तिच्या शरीरावरून ट्रक गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी असून, त्याच्यावर शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप जगताप, विलास यादव, पो. ह. अरविंद बाराळे, आणि भाऊसाहेब दिघे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रुबेल सिन्हा हिच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तरुण वयात गमावलेल्या जीवामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. अपघातामुळे महामार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता पुन्हा एकदा समोर आली आहे.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

शिरवळ पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, ट्रक चालकाला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच या दुर्घटनेने महामार्गावरील सुरक्षा उपायांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पोलिसांनी वाहनचालकांना अधिक सावध राहण्याचे आणि वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.अपघातानंतर पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांनी जखमींना धीर देण्याचा प्रयत्न केला व परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनाक्रमामुळे महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

पुण्यातील ‘या’ भागात जड वाहनास बंदी

पुण्यातील वाढलेले गंभीर अपघात रोखण्यासाठी व वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्ग परिसरातील भूमकर चौक भुयारी मार्ग ते नऱ्हे गावातील श्री कंट्रोल चौकदरम्यान जड वाहनांना बंदी घातली आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी हे आदेश दिले. सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेत जड वाहनांना बंदी असणार आहे. नऱ्हे, धायरी परिसराचा पुणे महापालिकेत समावेश झाला आहे. या भागात शैक्षणिक संस्था, खासगी कंपन्या आणि मोठ्या प्रमामात रुग्णालये, हॉटेल्स व्यवसायिक आहेत. रहिवाशी भाग देखील मोठा वाढला आहे. तसेच अपघातांचे प्रमाण विचारात घेऊन भूमकर चौकातील भुयारी मार्ग ते नऱ्हे गावातील श्री कंट्रोल चौक दरम्यान जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले आहेत. त्यामुळे दररोज सकाळी सात ते अकरा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ यावेळेत जड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. या परिसरातील रस्ते, अंतर्गत रस्त्यांवर वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सूट देण्यात आली आहे.

Web Title: 24 year old woman died on the spot in pune satara highway shindewadi accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • Pune
  • Pune Accident

संबंधित बातम्या

Maharashtra Rain: मेघालय, चेरापुंजी विसरा! महाराष्ट्रातील ‘या’ जागेवर केलाय पावसाने कहर
1

Maharashtra Rain: मेघालय, चेरापुंजी विसरा! महाराष्ट्रातील ‘या’ जागेवर केलाय पावसाने कहर

Pune Crime : दिवसा बँक अधिकारी, रात्री मटक्याचा बुकी; पुण्यातील बँक कर्मचाऱ्यासह १७ जण अटकेत
2

Pune Crime : दिवसा बँक अधिकारी, रात्री मटक्याचा बुकी; पुण्यातील बँक कर्मचाऱ्यासह १७ जण अटकेत

Pune News: पुणे Metro ड्रायव्हरलेस सेवा देणार! ‘या’ मार्गावर होणार सुरूवात, मात्र कारण काय?
3

Pune News: पुणे Metro ड्रायव्हरलेस सेवा देणार! ‘या’ मार्गावर होणार सुरूवात, मात्र कारण काय?

Pune Drug Rave Party: खडसेंच्या जावयाबाबत कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय; खेवलकरांना आता…
4

Pune Drug Rave Party: खडसेंच्या जावयाबाबत कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय; खेवलकरांना आता…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.