Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: पुणे Metro ड्रायव्हरलेस सेवा देणार! ‘या’ मार्गावर होणार सुरूवात, मात्र कारण काय?

सध्याच्या फेज १ मार्गांवर ऑटोमेशन आणले जाईल, परंतु चालक हे निरीक्षणासाठी उपस्थित राहतील. एकदा प्रणाली अपग्रेड झाल्यावर, फेज १ चे मार्गदेखील नंतर ड्रायव्हरलेस बनवले जाणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 25, 2025 | 08:05 PM
Pune News: पुणे Metro ड्रायव्हरलेस सेवा देणार! 'या' मार्गावर होणार सुरूवात, मात्र कारण काय?

Pune News: पुणे Metro ड्रायव्हरलेस सेवा देणार! 'या' मार्गावर होणार सुरूवात, मात्र कारण काय?

Follow Us
Close
Follow Us:

पुणे मेट्रोला प्रवाशांची वाढती मागणी
ड्रायव्हरलेस सेवा लवकरच सुरू होणार
खडकवसला ते खराडी या मार्गावर लागू होणार

पुणे: पुणे मेट्रो आता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात (फेज २) विनाचालक रेल्वे (ड्रायव्हरलेस ट्रेन) सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. ही सेवा सुरुवातीला खडकवसला ते खराडी या मार्गावर लागू केली जाणार आहे. पुणे शहरातील वाढती प्रवासी मागणी लक्षात घेता, या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी चुका कमी होणार आणि वेळेवरता अधिक वाढेल, अशी माहिती मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मेट्रोच्या सध्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार (डीपीआर) मेट्रो लाईन ४ मध्ये ATO (Attended Train Operation) मोड असावा, ज्यामध्ये ट्रेनमध्ये एक ड्रायव्हरसारखा व्यक्ती असेल जो सिग्नलिंग आणि ऑपरेशन्सचे निरीक्षण करेल. मात्र, वाढती प्रवासी मागणी आणि ट्रान्सशिपमेंट लक्षात घेता, पुणे मेट्रो UTO (Unattended Train Operation) मोड लागू करण्याचा विचार करत आहे. याचा अर्थ असा की ट्रेन ऑपरेशन्स पूर्णपणे, चालकाशिवाय (ड्रायव्हरलेस) पद्धतीने प्रणालीद्वारे पार पडतील.

दुसऱ्या टप्प्यातील, मार्गांवर सर्व ऑपरेशन्स, म्हणजे ट्रेन सुरू करणे, दारे उघडणे व बंद करणे, स्थानकांवर थांबणे आदी बाबी, या प्रणालीद्वारे स्वयंचलितपणे पार पडतील. सध्याच्या फेज १ मार्गांवर ऑटोमेशन आणले जाईल, परंतु चालक हे निरीक्षणासाठी उपस्थित राहतील. एकदा प्रणाली अपग्रेड झाल्यावर, फेज १ चे मार्गदेखील नंतर ड्रायव्हरलेस बनवले जाणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यामधील लाईन-४ ही ३१.६ किलोमीटर लांबीची असून २८ स्थानके असतील. मुख्य मार्ग खडकवासला ते खराडी असा असेल. या मार्गावर ड्रायव्हरलेस ऑपरेशन्ससाठी ७५ कोचेस (२५ ट्रेनसेट्स) खरेदी करण्याची योजना आहे. या लाईनवर युटीओ -आधारित सिग्नलिंग, सार्वजनिक घोषणा प्रणाली, प्रवासी माहिती प्रदर्शन प्रणाली, मास्टर क्लॉक, व्हॉइस रेकॉर्डिंग, टेलिफोन प्रणाली, सायबर सुरक्षा, सीसीटीव्ही आणि फायबर ऑप्टिक ट्रान्समिशनसारखी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे, अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Hinjewadi Metro News : हिंजवडी ते बाणेर मेट्रोला कधी मिळणार मुहूर्त? दिवाळीपूर्वी सुरु करण्याची IT कर्मचाऱ्यांची मागणी

टप्प्याटप्प्याने फेज १ ही ड्रायव्हरलेस

विनाचालक मेट्रो सेवा ही संकल्पना सुरवातीला केवळ दुसऱ्या टप्प्यात वापरली जाणार असली तरी पहिल्या टप्प्यासाठीही ती लागू करण्यात येणार आहे. मात्र तसे करतांना चालक हे उपस्थित राहणार असून ते केवळ निरीक्षणाचे काम करतील, अशीही माहिती देण्यात आली. अर्थात यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. खडकवासला ते हडपसर मार्गे खराडी या मार्गाची मान्यता केंद्र सरकारकडून लवकरच मिळण्याची शक्यता आहे. त्या सविस्तर प्रकल्प अहवालात विनाचालक मेट्रोचा समावेश करण्यात आला आहे.
या मार्गावर, नळस्टॉप ते माणिकबाग हा एक उपमार्ग असेल आणि त्यात सहा स्टेशन्स असतील. ही मेट्रो, वारजे, हडपसर, मगरपट्टासह मध्यवर्ती भागातील स्वारगेट भागातूनही जाईल. विनावाहक मेट्रो ही संकल्पना केवळ पुण्यातच नव्हे तर मुंबई दिल्लीसह अन्य महानगरांमध्येही राबवण्यात येणार आहे.

Web Title: Pune metro started driveless service khadakwasla to kharadi route pune metro

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 07:51 PM

Topics:  

  • Pune
  • Pune Metro
  • pune news

संबंधित बातम्या

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…
1

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा
2

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?
3

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
4

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.