Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aahilyanagar Mayoral Election: अहिल्यानगरचे महापौर-उपमहापौर ठरले; भाजपा-राष्ट्रवादी युतीचे शिक्कामोर्तब

भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात महापौर आणि उपमहापौरपदांचे वाटप प्रत्येकी सव्वा वर्ष असे ठरले आहे. मंत्री विखे पाटील यांनी तसे सांगितले, त्यामुळे पाच वर्षांत चार महापौर नगरकरांना पहायला मिळतील.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 03, 2026 | 05:36 PM
Aahilyanagar Mayoral Election: अहिल्यानगरचे महापौर-उपमहापौर ठरले; भाजपा-राष्ट्रवादी युतीचे शिक्कामोर्तब
Follow Us
Close
Follow Us:
  • अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार) अशी युती
  • भाजपच्या ज्योती गाडे महापौर, राष्ट्रवादीचे धनंजय जाधव उपमहापौर
  • पाच वर्षांत नगरला चार महापौर मिळणार
Maharashtra Politics:  महापौर आणि उपमहापौरपदी अनुक्रमे भाजपा- राष्ट्रवादी युतीचे ज्योती गाडे आणि धनंजय जाधव यांची निवड निश्चित झाली. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी या दोघांचे प्रत्येकी एक अर्ज आल्याने, बिनविरोध निवडीची घोषणा होणे आता केवळ औपचारिकता राहिली आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार) अशी युती होती. या युतीने ६८ पैकी ५२ जागा मिळवत मजबूत बहुमत मिळवले. यामध्ये राष्ट्रवादी २७आणि भाजपा २५ असे बलाबल आहे. महापौरपदाची पहिली संधी दोन्हीपैकी कोणत्या पक्षाला मिळणार आणि चेहरा कोण असणार याची गेले काही दिवस प्रतीक्षा होती. येथील महापौरपद ओबीसी (महिला) या प्रवर्गासाठी राखीव आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा नेते माजी खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्या निर्णयाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. आज या तिन्ही नेत्यांनी सर्व ५२ नगरसेवकांची बैठक घेतली. त्यात सुरुवातीला उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर बैठकीत चर्चा करून महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका ज्योती गाडे आणि उपमहापौरपदासाठी भाजपचे नगरसेवक धनंजय जाधव यांच्या नावावर शिक्का मोत’ब करण्यात आले. तशी घोषणा पालकमंत्री विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. नावांच्या घोषणेनंतर सर्व नगरसेवक महापालिका कार्यालयात गेले, नगरसचिव कार्यालयात नगरसचिव मेहेर लहारे यांच्याकडे गाडे आणि जाधव यांनी अनुक्रमे महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. आज उमेदवारीअर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला आहे.

PMC Mayoral Election: ठरलं तर! मंजुषा नागपुरे होणार पुण्याच्या महापौरपदी; सोमवारी होणार अधिकृत शिक्कामोर्तब

शुक्रवारी निवडीसाठी होणार विशेष सभा

६ फेब्रुवारीला दोन्ही पदांच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित केली आहे. या सभेत दाखल अर्जाची छाननी होईल. त्यानंतर बिनविरोध निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल. महापौरपदाच्या उमेदवार असलेल्या ज्योती गाडे (राष्ट्रवादी) या भाजपाचे दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या आहेत. गाडे आणि जाधव यांनी महापालिकेत नगरसेवक म्हणून यापूर्वीही काम केले आहे.

पाच वर्षांत नगरला चार महापौर मिळणार

भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात महापौर आणि उपमहापौरपदांचे वाटप प्रत्येकी सव्वा वर्ष असे ठरले आहे. मंत्री विखे पाटील यांनी तसे सांगितले, त्यामुळे पाच वर्षांत चार महापौर नगरकरांना पहायला मिळतील.

शिवाजीरावांची आठवण; गाडेंना अश्रू अनावर

आज वडील शिवाजीराव कर्डिले साहेब हयात असते तर त्यांना मोठा आनंद झाला असता, असे सांगत महापौरपदाच्या उमेदवार ज्योतीताई गाडे यांना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या, की अहिल्यानगर असे नामकरण झाल्यानंतर पहिल्या महापौरपदाचा मान मला मिळाला, ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे, अहिल्यादेवींचा आदर्श व वारसा अखंड ठेवण्यासाठी मी काम करीन. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास समर्थपणे पेलण्याचा मी प्रयत्न करेन.

KDMC Mayor: कल्याण-डोंबिवलीत सत्तावाटप निश्चित! महापौरपद शिंदे सेनेकडे

वरिष्ठांचा विश्वास मी सार्थ ठरवीन : जाधव

अर्ज दाखल केल्यानंतर उपमहापौर पदाचे उमेदवार धनंजय जाधव म्हणाले, की केंद्र, राज्य आणि शहर या तिन्ही पातळ्यांवर राष्ट्र‌वादी-भाजपा युतीची सत्ता आहे. नगरकरांना उत्तम सेवा देणे हीच आपली प्राथमिकता आहे. मूलभूत सुविधांपासून विकासाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व नगरसेवकाना सोबत घेऊन काम करू, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. संग्राम जगताप आणि माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहीन. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन.

स्थायीचे सभापतीपद जाणार भाजपकडे

पहिल्या वर्षी स्थायी समिती सभापतीपद भाजपकडे, सभागृहनेतेपद राष्ट्रवादीकडे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपद राष्ट्रवादी आणि उपसभापतिपद भाजपकडे असे वाटप झाल्याचे सांगण्यात येते. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह अहिल्यानगरच्या नागरिकांचे लक्ष आता याकडे लागले आहे.

 

Web Title: Aahilyanagar mayoral election jyoti gade becomes the mayor and dhananjay jadhav the deputy mayor of aahilyanagar municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • Ahilyanagar politics
  • Mayoral Reservation Lottery

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.