कल्याण-डोंबिवलीत सत्तावाटप निश्चित! (photo Credit- X)
केडीएमसी निवडणुकीच्या निकालांमध्ये शिंदे सेनेने ५३ जागा जिंकल्या आणि भाजपने ५० जागा जिंकल्याचे दिसून आले. दोन्ही पक्षांकडे बहुमतासाठी पुरेसे संख्याबळ होते, परंतु सुरुवातीला महापौरपदासाठी दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची स्पर्धा दिसून आली. दरम्यान, राज ठाकरे यांच्या मनसेने अनपेक्षितपणे शिंदे सेनेला पाठिंबा जाहीर केल्याने संपूर्ण राजकीय समीकरण महायुतीच्या बाजूने झुकले.
फार्म भरल्यानंतर शिंदे सेनेच्य हर्षाली थवील यांनी मांध्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे तसेच आमदार आणि जिल्हाप्रमुख आणि जनतेने माझ्यावर जो विश्वास ठेवलाय यासाठी मी सगळ्यांचे आभार मानत आहे. मी आता विकास कामावरती भर देणार आहे. रखडलेले प्रोजेक्ट नव्याने सुरू करणार आहे. घनकचरा व्यवस्थापन आणि आरोग्यासह इतर विकास कामाला प्राधान्य असणार आहे.
महापौरपदाच्या निवडणुका लांबणीवर; अजित पवारांच्या निधनामुळे महायुतीची नोंदणी रखडली
उमेदवारी दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. महायुतीला बळकटी दिल्याबद्दल त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राजू पाटील यांचे विशेष आभार मानले. येत्या ३ तारखेला होणाऱ्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुका बिनविरोध होतील असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर पदासाठी आज शिवसेना – भाजपा – मनसे – रिपाई महायुतीच्या उमेदवार हर्षाली थवील चौधरी यांचा तर उपमहापौर पदासाठी राहुल दामले यांचा उमेदवारी अर्ज महापालिका मुख्यालयात दाखल करण्यात आला. येत्या ३ फेब्रुवारी रोजी महायुतीचे हे दोन्ही उमेदवार बिनविरोध… pic.twitter.com/dYT0svbU9H — Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) January 30, 2026
गेल्या काही दिवसांपासून महापौरपदावरून शिंदे सेना आणि भाजपमध्ये जोरदार वाद सुरू आहे. वृत्तानुसार, दोन्ही पक्ष विरोधी नगरसेवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते. उद्धव सेनेतील दोन नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचे दावेही केले जात होते आणि भाजप इतर नगरसेवकांच्या संपर्कात होता. तथापि, आता या सर्व अटकळींना पूर्णविराम मिळाला आहे आणि महायुतीने एकत्र सत्तेत येण्याचा निर्णय घेतला आहे.
BMC Mayor Reservation : मुंबईवर कोण करणार ‘राज’? आरक्षण जाहीर होताच ‘या’ महिला नेत्यांची रंगली चर्चा






