भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात महापौर आणि उपमहापौरपदांचे वाटप प्रत्येकी सव्वा वर्ष असे ठरले आहे. मंत्री विखे पाटील यांनी तसे सांगितले, त्यामुळे पाच वर्षांत चार महापौर नगरकरांना पहायला मिळतील.
मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे, पिंपरी चिंचवड, भिवंडी, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, अमरावती, वसई विरार, परभणी, नांदेड, सांगली, मालेगाव, सोलापूर आणि धुळे येथे सर्वसाधारण गटाचा महापौर असेल.