Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहिल्यानगर : मोनिका राजळेंवर जमावाकडून हल्ला; आमदारसह तीन जण किरकोळ जखमी

विधानसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी पाथर्डीमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. 

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 21, 2024 | 03:47 PM
अहिल्यानगर : मोनिका राजळेंवर जमावाकडून हल्ला; आमदारसह तीन जण किरकोळ जखमी
Follow Us
Close
Follow Us:

पाथर्डी प्रतिनिधी : मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आमदार मोनिका राजळे यांच्यावर शिरसाटवाडी येथे जमावाकडून हल्ला होऊन घोषणाबाजी करण्यात आली. दगडफेकी मध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली असून दोन पोलीस कर्मचारी व सुरक्षारक्षकही किरकोळ जखमी झाले आहेत आमदार राजळे यांना मतदान केंद्रामध्ये सुमारे तीन तास ग्रामस्थांनी बसवून ठेवले होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आमदार मोनिका राजळे व त्यांचे एक दोन सहकारी सुरक्षारक्षक यांना बाळासाहेब शिरसाट यांचा निरोप आला होता. त्यानंतर आमदार राजळे या मतदान केंद्र पाहणीसाठी तेथे गेल्या होत्या. राजळे  गाडीतून उतरतानाच “प्रताप काका जिंदाबाद” “खासदार नवा आमदार नवा” अशा घोषणा जमावाकडून सुरू झाल्या. याकडे दुर्लक्ष करत आमदार राजळे मतदान केंद्रात गेल्या .तेथील कार्यकर्त्यांनी त्यांना तुम्ही बाहेर निघा आपण मते वाटून घेऊ, तुमचे कार्यकर्ता प्रतिनिधी ओळखपत्र चुकीचे आहे, अशा स्वरूपाची विचारणा केली. मात्र तेथील तणावाची परिस्थिती बघत आमदार राजळे यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले.

अखंड विकासाचे कमळ फुलले; निकालाआधीच भाजप उमेदवारांच्या विजयाचे बॅनर

मतदान केंद्राबाहेर येताच दोन-तीन दगड आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दिशेने जमावाकडून भिरकावण्यात आले. त्यातील काही दगडे लागून राजळेंचे कार्यकर्ते जखमी झाले. राजळे पुन्हा मतदान केंद्रात गेल्या बाहेर जमाव घोषणा देत होता. मतदान केंद्रामध्ये मतदानाला जाण्यासाठी आलेल्या चार-पाच महिला सुद्धा अडकून पडल्या. आमदारांनी पोलिसांना फोन करताच काही वेळाने पोलीस शिरसाटवाडी येथे दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य बघत त्यांनी आमदारांना संरक्षण देत वाढीव बंदोबस्त तैनात केला. सुमारे तीन किलोमीटर अंतरावर गावाबाहेर आमदार समर्थकांचा जमाव घोषणा देत होता. त्याचबरोबर आमदार विरोधी जमा गावांमध्ये घोषणा देत होता. अत्यंत तणावाच्या वातावरणात पोलिसांनी आमदारांना जुन्या शिरसटवाडी रस्ता मार्गे सुरक्षित आणले. मात्र ठिकठिकाणी शहरात संतप्त कार्यकर्ते प्रतिकारासाठी उभे होते.मतदार संघातील शिंगोरी, अकोले, भारजवाडी अशा ठिकाणी सुद्धा अस्थिर वातावरण असल्याच्या कार्यकर्त्यांच्या निरोपामुळे आमदारांनी तेथे भेट दिली. पाथर्डी शहर व तालुक्यात अत्यंत तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी तातडीने जमावबंदी आदेश जारी केला.

“माझ्यावर जनतेने टाकलेला विश्वास 23 तारखेला दिसेल”;नितेश राणे यांचं वक्तव्य

घटनेची माहिती समजताच पोलीस ॲक्शन मोडवर

दरम्यान घटनेची माहिती समजताच पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यासह सुमारे 100 पोलिसांचा फौज फाटा पाथर्डी शिरसाटवाडी व आमदारांच्या शहरातील निवासस्थानाभोवती तैनात करण्यात आला. याबाबत आमदार मोनिका राजळे यांच्याशी चर्चा केली.भावनेच्या भरात तरुणांकडून घडलेले कृत्य निषेधार्ह असले तरीही त्यांच्या आयुष्याचा विचार करता कुठलीही कायदेशीर कारवाई आपल्याला करायची नाही. राजळे कुटुंबाचे सर्व जाती-धर्माच्या लोकांची अत्यंत सलोख्याचे व कौटुंबिक वातावरणाचे संबंध आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे तणाव न बाळगता सर्व कार्यकर्त्यांनी शांतता राखावी असे मोनिका राजळे यांनी सांगितले.


Web Title: Ahilyanagar monica rajle attacked by mob three persons including the mla were slightly injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2024 | 03:46 PM

Topics:  

  • Ahamadnagar
  • Maharashtra Asselbly Election 2024
  • maharashtra election 2024

संबंधित बातम्या

‘व्हिडिओ कॉल केला, अन…’, ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर अत्याचाराचा  गंभीर आरोप!
1

‘व्हिडिओ कॉल केला, अन…’, ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर अत्याचाराचा गंभीर आरोप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.