Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mayor of Mumbai : कलमा पठण करणारी मुस्लिम महिलाच मुंबईची महापौर होणार…; AIMIM नेत्याचा दावा

मुंबईचा महापौर हा मराठी झाला पाहिजे अशी मागणी केली जात आहे. यामध्ये आता एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी मुस्लीम महिला मुंबईच्या महापौर का नाही असा सवाल उपस्थित केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 05, 2026 | 12:24 PM
BMC Election 2026, BMC Election Result 2026, BMC Election Result 2026 Live Updates, मुंबई महानगरपालिका निवडणुक 2026

BMC Election 2026, BMC Election Result 2026, BMC Election Result 2026 Live Updates, मुंबई महानगरपालिका निवडणुक 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबईच्या महापौर पदावरुन रंगले राजकारण
  • मुंबईचा महापौर मुस्लीम महिला होण्याचा केला दावा
  • एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांचे वक्तव्य
Maharashtra Politics : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Local Body Elections) रणधुमाळी सुरु आहे. मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणूका जाहीर झाल्या असून जोरदार प्रचार सुरु आहे. मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मागील 25 वर्षांच्या सत्ता कायम राखण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने मनसेसोबत युती केली आहे. मात्र मुंबईचा महापौर कोण होणार यावरुन राजकारण तापले आहे. मुंबईचा महापौर हा मराठी झाला पाहिजे अशी मागणी केली जात आहे. मराठीच महापौर होणार असा दावा मनसे-शिवसेना युतीने केला आहे. तर महापौर हा हिंदू होणार असा दावा भाजपने (BJP Politics) केला आहे. मात्र यामध्ये आता मुस्लीम नेत्याने मुस्लीम महिला मुंबईच्या महापौर होणार असल्याचा दावा केला आहे.

येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्याचबरोबर 16 तारखेला निकाल देखील हाती येणार आहे. यामध्ये मुंबईकर कोणाच्या हाती कौल देणार हे स्पष्ट होणार आहे. मात्र त्यापूर्वी मुंबई महापौर कोण होणार यावरुन वाद निर्माण झाला आहे. महापौर मराठीच झाला पाहिजे अशी मागणी शिवसेना-मनसेकडून केली जात आहे. तर हिंदू महापौर भाजपकडून केला जाण्याची शक्यता आहे. यावरुन आता आणखी वाद चिघळला आहे. एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाला जोरदार प्रतिउत्तर देत थेट मोठा दावा केला आहे. आता वारिस पठाण यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा होत असून दुसऱ्या मोठ्या वादाला तोंड फुटले.

हे देखील वाचा : दादा, हाच का तुमचा वादा? सुस बाणेरकरांनी भर प्रचार सभेत अजित पवारांना दाखवला आरसा

काय म्हणाले वारिस पठाण?

अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महापौर पदाबाबत वारिस पठाण यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले की, “जर मुस्लिम राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश होऊ शकतो, तर मग एक मुस्लिम महिला महापौर का नाही होऊ शकत? धारावीतील एका सभेला संबोधित करताना वारिस पठाण म्हणाले की, हे विधान संविधान आणि लोकशाही या दोन्हींच्या विरोधात आहे. आमचे एक स्वप्न आहे की, एक दिवस कलमा पठण करणारी मुस्लिम महिला मुंबईची महापौर बनेल,” अशी इच्छा वारिस पठाण यांनी व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा : खासदार प्रणिती शिंदे भाजपच्या वाटेवर? देवेंद्र फडणवीसांसोबत डील झाल्याचा बड्या नेत्याचा दावा

पुढे ते म्हणाले की, “मला एक सांगा की, मी महादेवावर प्रेम करतो, असे वक्तव्य करणारी व्यक्ती जर महापौर होऊ शकते तर मग हिजाब घालणारी आणि कलमा पठण करणारी मुस्लिम महिला का महापौर होऊ शकत नाही?” असा प्रश्न एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी उपस्थित केला आहे. मुंबईच्या राजकारणामध्ये आधीच महापौरवरुन वाद निर्माण झालेला असताना आणि भाजप व शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरु असताना वारिस पठाण यांनी वक्तव्य केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Aimim waris pathan claimed mayor of mumbai will be a muslim woman bmc elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 12:24 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.