Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Corruption Allegation: मनोज जरांगेंवर १,००० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; अजय बारस्करांची ED कडे तक्रार

Manoj Jarange Corruption: सुरुवातीला जरांगे पाटील "मी ओपन चर्चा करतो, बंद दाराआड चर्चा करत नाही" असे म्हणायचे. मंतर मात्र त्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी बंद दाराआड चर्चा आणि सेटिंगही केली.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 11, 2026 | 11:48 AM
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगे पाटील आणि सहकाऱ्यांवर १ हजार कोटींच्या घोटाळ्याचा अजय बारस्करांचा आरोप.
  • १५ दिवसांपूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाकडे (ED) अधिकृत तक्रार दाखल केल्याचा दावा.
  • जरांगेंचे निकटवर्ती पांडुरंग तारक यांच्याकडे १० गुंठ्यांवरून ५० एकर जमीन झाल्याचा आक्षेप.
Manoj Jarange corruption allegation: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची संपत्ती उघड झल्यास मराठा समाजच त्यांना सोडणार नाही, असा इशारा मराठा कार्यकर्ते अजय बारस्कर यांनी दिला आहे. इतकेच नव्हे तर, आंदोलनाच्या नावाखाली जरांगे पाटील यांच्या निकटवर्तीयांनी आंदोलनाच्या नावाखाली प्रचंड अवैध माया जमवली असल्याचा आरोपही बारस्कर यांनी केला आहे. बारस्कर यांच्या या आरोपांमुळे मराठा आंदोलनासह राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे यांच्यावर बारस्कर यांनी १००० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला असून याबाबत त्यांनी ईडीकडे तक्रार केल्याचेही म्हटलं आहे. यासंदर्भात बोलताना बारस्कर म्हणाले की, मी १५ दिवसांपूर्वीच अंमलबजावणी संचलनालयाकडे मनोज जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात तक्रार दिली आहे. आंदोलनाच्या नावाखाली जरांगे पाटील यांच्या जवळच्या लोकांनी प्रचंड अवैध माया जमवली आहे. पांडुरंग तारक यांच्याकडे आधी फक्त १० गुंठे जमी होती. आता त्यांच्याडे ५० एकर जमीन आहे. त्यांनी आंतरवली आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये कोट्यवधींच्या जमिनी खरेदी केल्या आहेत.

Mantralaya Staff Relieved Decision: मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा निर्णय ! ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी

‘बंद दाराआड’ चर्चा आणि सेटिंगचे आरोप

सुरुवातीला जरांगे पाटील “मी ओपन चर्चा करतो, बंद दाराआड चर्चा करत नाही” असे म्हणायचे. मंतर मात्र त्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी बंद दाराआड चर्चा आणि सेटिंगही केली. उदय सामंत, संदीपान भुमरे, अजित पवार, शरद पवार, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांसारख्या अनेक नेत्यांसोबत त्यांनी बंद दाराआड नेमकी काय चर्चा केली हे स्पष्ट करावे, असे आव्हान बारस्कर यांनी दिले.

“मनोज जरांगे हे सामाजिक खरात बाबा आहेत”

ज्याप्रमाणे कॅप्टन अशोक खरातच्या पाया पडायला बडे बडे नेते जायचे, नंतर त्याचे बिंग फुटले आणि तो जेलमध्ये गेला, तसेच मनोज जरांगे हे सामाजिक खरात बाबा आहेत. जरांगे हे उपोषणाचे नाटक करून मराठा समाजाला फसवत आहेत, असा आरोपही बारस्कर यांनी केला.

जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आता उपोषणाचे व्यसन लागले आहे. जरांगे उपोषणाच्या नावाखाली सलाईनच्या माध्यमातून ग्लुकॉंडी पितात. त्यांनी आता अधिकृतपणे उपोषण सोडावे, मात्र ते उपोषणाचा मांडव सोडू शकत नाहीत, असे बारस्कर म्हणाले.

‘शाहरुख-सलमान चालतात, मग मुस्लिम का नाही?’ आयोगाचा नितेश राणेंना सवाल,दांडियात मुस्लिमांना प्रवेश नाकारण्यावरून नवा वाद

मराठा समाजाची दिशाभूल

अंतरवली सराटी येथे २ सप्टेंबर रोजी ‘जिंकलो रे राजा’ अशी घोषणा देऊन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप केला. हैदराबाद गॅझेटचा जीआर आणि ‘सगेसोयरे’ या मुद्द्यांवरून जरांगे यांनी मराठा समाजाची, विशेषतः महिलांची फसवणूक केल्याचा दावाही बारस्कर यांनी केला.

‘महागडी गाडी वापरताना मनाला काहीच वाटले नाही का?’

मराठा आंदोलनादरम्यान ३५० पेक्षा अधिक तरुणांचे बळी गेल्याचा दावा करत जरांगे यांच्या महागड्या वाहनाच्या वापरावरही प्रश्न उपस्थित करण्यात आला. आंदोलनात तरुणांचे बलिदान झाले असताना सुमारे २ कोटी रुपये किमतीची Defender गाडी वापरताना जरांगे यांच्या मनाला काहीच वाटले नाही का, असा सवालही बारस्कर यांनी उपस्थित केला.

दरम्यान, जरांगे यांच्या आंदोलनातील सहभागींबाबतही टीका करण्यात आली आहे. आंदोलनात जरांगे यांच्यासोबत खरा ‘गरजवंत मराठा’ नसून वाळू व्यावसायिक आणि कॉन्ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Web Title: Ajay baraskar alleges 1000 crore corruption against manoj jarange ed complaint filed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • Manoj Jarange

संबंधित बातम्या

‘आता शिष्टमंडळ जाणार नाही, शेवटी त्यांनी…’; विखे-पाटलांनी जरांगेंबाबत नेमकं काय म्हटलं?
1

‘आता शिष्टमंडळ जाणार नाही, शेवटी त्यांनी…’; विखे-पाटलांनी जरांगेंबाबत नेमकं काय म्हटलं?

Maratha Reservation Update: मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा १० वा दिवस; मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचे ४ मोठे GR जारी!
2

Maratha Reservation Update: मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा १० वा दिवस; मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचे ४ मोठे GR जारी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.