Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आता शिष्टमंडळ जाणार नाही, शेवटी त्यांनी…’; विखे-पाटलांनी जरांगेंबाबत नेमकं काय म्हटलं?

सरकार एक पाऊल पुढे येत असेल, तर त्यांनीही समजून घेतलं पाहिजे. आमच्याकडे जे पर्याय होते, ते सर्व करून झाले आहेत. यामध्ये राजकारण आणायचं नाही. प्रश्न सुटला पाहिजे. आज न्यायमूर्ती शिंदे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 08, 2026 | 04:14 PM
'आता शिष्टमंडळ जाणार नाही, शेवटी त्यांनी...'; विखे-पाटलांनी जरांगेंबाबत नेमकं काय म्हटलं?

'आता शिष्टमंडळ जाणार नाही, शेवटी त्यांनी...'; विखे-पाटलांनी जरांगेंबाबत नेमकं काय म्हटलं?

Follow Us
Follow Us:

मुंबई : जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेली ही नियमित बैठक होती. आपण घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी केली जाते की नाही, याचा आढावा घेण्यासाठी ही बैठक होती. मनोज जरांगे पाटील अजूनही ठाम असतील, तर तो त्यांचा निर्णय आहे. त्यांचं समाधान होत नसेल, तरी आपण प्रयत्न करत आहोत. त्यांच्या मनात अजूनही काही अपेक्षा असतील, तर त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, असे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या हितासाठी काही निर्णयांची अंमलबजावणी सुरू आहे. देवेंद्र फडणवीस समाधानी नसतील, तर माझ्यापुढे पर्याय नाही. ५८ लाख नोंदणी आम्ही ग्रामपंचायतींकडे प्रसिद्ध केली आहे. लोकांनी अर्ज केले आहेत. एकूण ५२० अर्ज आले आहेत. त्यापैकी २४० अर्ज केवळ दाखले काढण्यासाठीचे होते. जशी वस्तुस्थिती समोर येईल, तसे वंशावळीतील बदल असतील तर त्यानुसार दाखले दिले जातील. याबाबत आम्ही यापूर्वीही त्यांना सांगितलं आहे की, मुख्यमंत्र्यांकडे आम्ही चर्चा केली आहे. ज्यांनी काहीही दिलं नाही, ते या दोन नेत्यांनी पुढे येऊन काम केलं आहे. ज्यांनी काम केलं, त्यांनाच तुम्ही नावं ठेवत आहात.

Uddhav Thackeray : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा,’ उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; DJ च्या गोंगाटावरही मांडली स्पष्ट भूमिका

दरम्यान, मराठा समाज हे मान्य करणार नाही. सरकार सकारात्मक नसतं, तर विषय वेगळा होता. गेल्या २५-३० वर्षांत असे चांगले निर्णय झाले नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आरक्षण घालवलं. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी समाधान व्यक्त केलं पाहिजे. त्यांनी अल्टिमेटम द्यावा की नाही, हा त्यांचा निर्णय आहे.

आता शिष्टमंडळ जाणार नाही, शेवटी त्यांनी…

तसेच समितीला मर्यादित मुद्दे देण्यात आले आहेत. त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले नाहीत. आज मराठवाड्यात साडेतीन लाख मुलांनी SEBC चे दाखले काढले आहेत. महायुती सरकारने सुरू केलेल्या सर्व योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. आता शिष्टमंडळ जाणार नाही. शेवटी त्यांनी सरकारची भूमिका समजून घेतली पाहिजे.

आता पुढचा मार्ग मनोज जरांगे पाटील काढतील

सरकार एक पाऊल पुढे येत असेल, तर त्यांनीही समजून घेतलं पाहिजे. आमच्याकडे जे पर्याय होते, ते सर्व करून झाले आहेत. यामध्ये राजकारण आणायचं नाही. प्रश्न सुटला पाहिजे. आज न्यायमूर्ती शिंदे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून या नोंदणी शोधल्या जात आहेत. आता पुढचा मार्ग मनोज जरांगे पाटील काढतील.

Web Title: Know what exactly did radhakrishna vikhe patil say about manoj jarange and maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • Radhakrishna Vikhe Patil

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil: महायुतीत ठिणगी! मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या दाव्याने राजकारण तापलं; शिंदेसेनेने भाजपला धरलं धारेवर
1

Manoj Jarange Patil: महायुतीत ठिणगी! मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या दाव्याने राजकारण तापलं; शिंदेसेनेने भाजपला धरलं धारेवर

Manoj Jarange Patil On Eknath Shinde: शिंदे साहेब, ५०० कोटी घेतले का? फक्त हो किंवा नाही सांगा; जरांगेंची मागणी
2

Manoj Jarange Patil On Eknath Shinde: शिंदे साहेब, ५०० कोटी घेतले का? फक्त हो किंवा नाही सांगा; जरांगेंची मागणी

मनोज जरांगे तुझी औकात काय? रामदास कदमांचा जरांगे पाटलांवर घणाघात
3

मनोज जरांगे तुझी औकात काय? रामदास कदमांचा जरांगे पाटलांवर घणाघात

Manoj Jarange Patil News: ‘मला ५०० कोटी दिल्याचे भाजपला का सांगितले? मनोज जरांगे पाटलांचे एकनाथ शिंदेंना असं का म्हणाले
4

Manoj Jarange Patil News: ‘मला ५०० कोटी दिल्याचे भाजपला का सांगितले? मनोज जरांगे पाटलांचे एकनाथ शिंदेंना असं का म्हणाले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.