Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मनोज जरांगे नेमकं कोणासाठी उपोषण करतायत?’; अजय बारस्करांचा थेट सवाल, ‘चार जणांसाठी जीव धोक्यात घालू नका’

मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले असताना मराठा आरक्षणाचे अभ्यासक अजय बारस्कर यांनी त्यांच्या उपोषणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘जरांगे नेमकं कोणासाठी उपोषण करतायत?’ असा सवाल त्यांनी केला आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 15, 2026 | 07:15 PM
‘मनोज जरांगे नेमकं कोणासाठी उपोषण करतायत?’; अजय बारस्करांचा थेट सवाल

‘मनोज जरांगे नेमकं कोणासाठी उपोषण करतायत?’; अजय बारस्करांचा थेट सवाल

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या उद्देशावर अजय महाराज बारस्करांचा सवाल.
  • ‘स्वतःच्या सहीचं मागण्यांचं सविस्तर निवेदन समाजासमोर आणा’, अशी मागणी.
  • चौघांचे दाखले आणि कथित चौकशा थांबवण्यासाठी दबाव आणला जातोय का, याचं उत्तर देण्याचं आव्हान.
 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलंच तापलं आहे. गेल्या 18 दिवसांपासून उपोषण करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. 19 सप्टेंबरपासून आझाद मैदानावर उपोषण करण्याचा त्यांचा निर्धार आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. तरीही जरांगे मुंबईकडे निघाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचे अभ्यासक अजय बारस्कर यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर थेट सवाल उपस्थित केला आहे. ‘मनोज जरांगे नेमकं कोणासाठी उपोषण करतायत?’ असा प्रश्न त्यांनी केला. हे उपोषण खरंच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आहे की चौघांना दाखले मिळवून देण्यासाठी आणि काही चौकशा थांबवण्यासाठी, याचं उत्तर जरांगे यांनी द्यावं, असं बारस्कर यांनी म्हटलं आहे.

‘स्वतःच्या सहीचं मागण्यांचं निवेदन कुठे?’

बारस्कर यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. जरांगे यांचं उपोषण मराठा समाजासाठी असेल, तर त्यांच्या स्वतःच्या सहीचं मागण्यांचं सविस्तर निवेदन कुठे आहे? त्या निवेदनात नेमक्या कोणत्या मागण्या आहेत, त्या सरकारकडे कधी देण्यात आल्या आणि आतापर्यंत सरकारने त्यापैकी किती मागण्या मान्य केल्या, याची माहिती समाजासमोर का ठेवली जात नाही, असा सवाल त्यांनी केला.

Manoj Jarange Patil : ‘समाजाच्या लेकरांसाठी लढून मरेन, आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही,’ जरांगे पाटील मुंबईकडे रवाना

तसंच, जरांगे यांच्या आसपास असलेल्या काही व्यक्तींवर विविध यंत्रणांच्या नोटिसा आणि चौकशी सुरू असल्याचा दावा बारस्कर यांनी केला. या चौकशा थांबवण्यासाठी जरांगेंवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र, हे आरोप बारस्करांचे दावे आहेत.

जरांगेच्या जीवाला धोका झाला तर जबाबदार कोण ?

जरांगे यांच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर त्यासाठी कोण जबाबदार असेल, असा सवालही बारस्कर यांनी उपस्थित केला. केवळ चार व्यक्तींच्या प्रमाणपत्रांसाठी किंवा चौकशा थांबवण्यासाठी जरांगेंवर उपोषणाचा दबाव आणला जात असेल, तर संबंधितांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने पुढील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे बारस्करांच्या या आरोपांवर जरांगे पाटील काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Rohit Pawar News: आदित्य ठाकरेंना क्लीनचीटच मिळेल; सीबीआयच्या FRIनंतर रोहित पवारांचा घणाघात!

Web Title: Ajay baraskar question manoj jarange maratha reservation fast mumbai protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 07:15 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil : ‘समाजाच्या लेकरांसाठी लढून मरेन, आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही,’ जरांगे पाटील मुंबईकडे रवाना
1

Manoj Jarange Patil : ‘समाजाच्या लेकरांसाठी लढून मरेन, आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही,’ जरांगे पाटील मुंबईकडे रवाना

Manoj Jarange Mumbai Morcha: पोलिसांचा आंदोलनाला नकार; मनोज जरांगेंची तिरपी चाल, आता थेट हायकोर्टात जाण्याची तयारी!
2

Manoj Jarange Mumbai Morcha: पोलिसांचा आंदोलनाला नकार; मनोज जरांगेंची तिरपी चाल, आता थेट हायकोर्टात जाण्याची तयारी!

Manoj Jarange : जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी मान्य, आता मुंबईत उपोषणाला परवानगी मिळणार?
3

Manoj Jarange : जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी मान्य, आता मुंबईत उपोषणाला परवानगी मिळणार?

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन
4

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.