Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप व शिंदे गटाच्या वाचाळवीर नेत्यांवर अजित पवार नाराज; थेट दिल्ली दरबारी करणार तक्रार

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी महायुतीची जोरदार तयारी आणि प्रचार सुरु झाला आहे. मात्र महायुतीमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता पुन्हा एकदा शिंदे गट व भाजप पक्षातील वाचाळवीर नेत्यांवर अजित पवार नाराज असल्याचे समोर आले आहे. तसेच ही नाराजी ते थेट दिल्लीमध्ये व्यक्त करणार असल्याचे देखील समोर आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 19, 2024 | 03:35 PM
dcm ajit pawar in mahayuti

dcm ajit pawar in mahayuti

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचा गुलाल उधळणार आहे. निवडणूक आयोग देखील कामाला लागले असून येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणूका होणार आहेत. दरम्यान राज्यामध्ये महायुतीची तयारी जोरदार सुरु आहे. मात्र महायुतीमधील अजित पवार यांच्याबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अजित पवार हे नाराज असल्याच्या देखील चर्चा आहेत. आता आणखी एक माहिती समोर येत आहे. अजित पवार हे राज्यातील काही भाजप नेते व शिंदे गटातील नेत्यांवर नाराज आहे. ते ही नाराजी आणि त्या नेत्यांबाबत थेट दिल्ली दरबारी तक्रार दाखल करणार आहेत.

मागील अनेक दिवसांपासून महायुतीमधील काही नेत्यांकडून वादग्रस्त विधानं केली जात आहेत. राज्यामध्ये समाजामध्ये आणि धर्मांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होईल अशी वक्तव्य सातत्याने केली जात आहेत. यामुळे राजकारणासह  समाजामध्ये देखील याबाबत चर्चा होत आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज आहेत. महायुतीमधील वाचाळवीर नेत्यांमध्ये शिवसेना शिंदे गटातील संजय गायकवाड, संजय शिरसाट तसेच भाजप आमदार नितेश राणे, खासदार अनिल बोंडे यांसह अनेक नेत्यांचा समावेश आहे.

अजित पवार यांनी महायुतीमधील शिंदे गट व भाजपमधील नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी देखील त्यांनी वादग्रस्त विधानं करणाऱ्या नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. आता देखील बुलढाण्यामधील सभेमध्ये सत्ताधारी व विरोधी कोणत्याही नेत्यांनी वादग्रस्त विधानं करु नये. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे म्हणत अजित पवार यांनी वाचाळवीर नेत्यांना सुनावले आहे. आता याबाबत ते दिल्लीला भाजप श्रेष्ठींकडे तक्रार करणार आहेत.

अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे हे दिल्लीमध्ये तक्रार करणार आहेत. ही तक्रार महायुतीच्या नेत्यांविरोधात असणार आहे. वादग्रस्त विधान करत असल्यामुळे महायुतीची बदनामी होते. तसेच याचा फटका आगामी विधानसभेमध्ये बसू शकतो. त्यामुळे भाजप नेत्यांच्या वक्तव्यांकडे लक्ष द्यावे, असे अजित पवार गटाकडून सांगितले जाणार आहे. यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, वादग्रस्त विधानाबद्दल अजित पवार दिल्लीत काय तक्रार करणार, याची मला माहिती नाही. अजितदादा यांना ते काय तक्रार करणार याबद्दल विचारायला हवं. त्यांनी तक्रार केल्यानंतर आमच्या वरिष्ठांनी काय म्हटलं, हे पण त्यांना विचारा, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

Web Title: Ajit pawar will complaint at delhi to motabhai amit shah about bjp and shinde shivsena leaders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2024 | 03:35 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Amit Shah
  • devendra fadnavis
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध
1

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध

130th Amendment Bill 2025: पंतप्रधानांपासून नगरसेवकांपर्यंत द्यावा लागणार राजीनामा; संसदेत सादर होणार ‘हे’ नवे विधेयक
2

130th Amendment Bill 2025: पंतप्रधानांपासून नगरसेवकांपर्यंत द्यावा लागणार राजीनामा; संसदेत सादर होणार ‘हे’ नवे विधेयक

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
3

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
4

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.