
Alliance between Vanchit Bahujan Aghadi and Congress breaks down Nanded Political News
Maharashtra Local Body Election : नांदेड : केवळ १२ दिवस टिकलेल्या काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा निवडणूक समन्वयक अविनाश भोसीकर यांनी आज पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. “युती आम्ही तोडलेली नसून काँग्रेसनेच खंजीर खुपसला. गुप्त राजकारण करून वंचितला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न झाला,” असा आरोप त्यांनी केला.
११ नोव्हेंबर रोजी दोन्ही पक्षांनी जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीसाठी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काहीच दिवसांत युतीत तडे गेले. भोसीकर म्हणाले, “वंचितकडून सर्व ठिकाणी एकूण १३५ जागांची मागणी होती. परंतु काँग्रेसने कंधारमध्ये ३ व बिलोलीमध्ये १ अशा केवळ ४ जागा देऊ केल्या. ही वाटणी अपमानास्पद आणि वंचितची ताकद कमी लेखणारी होती.”
युती तुटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे ३६ उमेदवार रणांगणात उत्तरवले आहेत. आहेत. “जनतेकडून आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत असून स्वबळावरही आम्ही मजबूत लढत देऊ, असा विश्वास भोसीकर यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेत अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते गैरहजर होते. त्यामुळे अंतर्गत नाराजीचे संकेत दिसत असले तरी “ही अनुपस्थिती काही कारणांमुळे असून संघटनेत मतभेद नाहीत,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. काँग्रेस वंचित युती केवळ बारा दिवसांत कोसळल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दलित-बहुजन मतदारांवर प्रभाव टाकण्याची काँग्रेसची योजना आणि स्थिर जागांची अपेक्षा असलेली वंचितची रणनीती दोन्ही अपयशी ठरली. पत्रकार परिषदेत वंचितने गंभीर आरोपही केले. रवींद्र चव्हाण आणि हणमंत पाटील बेटमोगरेकर हे अशोक चव्हाणांचे “एजंट” म्हणून जागावाटप व युती चर्चेत सतत हस्तक्षेप करीत असल्यामुळेच युती तुटल्याचा दावा आघाडीने केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वंचितसोबतच्या आघाडीबाबत मार्ग काढू : हणमंत पाटील बेटमोगरेकर
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकीसाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी झाल्याचे संयुक्त पत्रकार परिषदेत यापूर्वी जाहीर केले गेले आहे. दरम्यानच्या काळात उमेदवारी दाखल करण्यावरून काही गैरसमज झाले असतील तर वंचित सोबत बसून चर्चा करणार आहेत. शेवटी सेक्युलर मतांची विभागणी होऊ नये यासाठी वंचित सोबतच्या आघाडी करिता काँग्रेस आग्रहीच आहे व यापुढे देखील असेल असे मत काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी व्यक्त आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकीत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाली आहे. मात्र काही जागा वाटपावरुन आघाडी बाबत संभ्रम निर्माण केला जात असेल तर काँग्रेसच्या वतीने संभ्रम दुर करू वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी एकत्र बसून मार्ग काढू. शेवटी सेक्युलर मतांची विभागणी योग्य नाही ही भूमिका काँग्रेसची आहे. आघाडी वरुन संभ्रम निर्माण झाला असेल तर योग्य मार्ग काढू, असे ते म्हणाले.