Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jagdeep Dhankhar resigned : मी आजारी नव्हतो तर…! राजीनाम्याबाबत माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मोठे वक्तव्य

माजी उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, राजस्थानमध्ये याबाबत त्यांनी वक्तव्य केले असून मी आजारी नव्हतो अशी कबुली जगदीप धनखड यांनी दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 27, 2026 | 12:58 PM
vice president jagdeep dhankhar resigns reason is not health political news update

vice president jagdeep dhankhar resigns reason is not health political news update

Follow Us
Close
Follow Us:
  • माजी उपराष्ट्रपती धनखड यांच्या राजीनाम्यावरुन रंगला वाद
  • जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्याबाबत वक्तव्य
  • राजकीय चर्चेंना जोरदार उधाण
Jagdeep Dhankhar resigned : राजस्थान : मागील वर्षी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे जोरदार चर्चेत आले होते. अधिवेशन सुरु होताच दुसऱ्याच दिवशी धनखड यांनी अचानकपणे राजीनामा दिला होता. (Political News) उपराष्ट्रपतींनी तडकाफडकी दिलेल्या या राजीनाम्यावरुन राजकीय रान उठले होते. या विरोधकांनी संशय देखील व्यक्त केला होता. आता पुन्हा एकदा धनखड यांचा राजीनामा हा चर्चेत आला आहे, राजस्थानमध्ये याबाबत त्यांनी वक्तव्य केले असून मी आजारी नव्हतो अशी कबुली जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी दिली आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे जोरदार चर्चा रंगल्या होत्या. धनखड यांनी आजारपणाचे कारण देत हा राजीनामा दिला होता.याबाबत माजी उपराष्ट्रपती धनखड यांनी एक मोठे विधान केले आहे. गुरुवारी राजस्थानमधील चुरू येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मागील वर्षी राजीनामा प्रकृती अस्वास्थ्यामुळे नव्हता, तर त्यांनी त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे धनखड यांनी स्पष्ट केले आहे.

हे देखील वाचा : BMC महापौर रितू तावडे यांचे कोट्यवधींचे घड्याळ चर्चेत? ट्रोलिंग होताच दिलं सडेतोड उत्तर

राजीनाम्याचे कारण आणि धनखड यांचे विधान

चुरू येथे एका छोट्या मेळाव्याला संबोधित करताना जगदीप धनखड म्हणाले, “असे म्हटले जाते की पहिले सुख म्हणजे निरोगी शरीर. मी कधीही माझ्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले नाही. जेव्हा मी राजीनामा देत असल्याचे म्हटले तेव्हा मी कधीही असे म्हटले नाही की मी आजारी आहे. मी आरोग्याला प्राधान्य दिले आहे आणि ते असले पाहिजे.”असे वक्तव्य माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.

हे देखील वाचा : मद्य घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट! अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता, कोर्टात नेमकं काय घडलं

२१ जुलै २०२५ रोजी राष्ट्रपतींना सादर केलेल्या राजीनामा पत्रात धनखड यांनी लिहिले आहे की ते “आरोग्य सेवेला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी” आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत असे राजीनाम्याचे कारण सांगितले होते. मात्र या कारणावरुन देखील मोठी राजकीय चर्चा रंगली होती. तसेच राजीनाम्यानंतर धनखड यांनी माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले. तसेच सार्वजनिक जीवनातून देखील ब्रेक घेतला होता. त्यांचे हे मौन चर्चेस कारण बनले.

राहुल गांधींनी व्यक्त केला होता संशय 

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धनखड यांच्या अचानक राजीनाम्याबद्दल आणि त्यानंतरच्या मौनाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी राहुल गांधी म्हणाले, “त्यांनी राजीनामा का दिला यामागे एक मोठी कहाणी आहे. तुमच्यापैकी काहींना ते माहित असेल, काहींना ते माहित नसेल. पण त्यामागे निश्चितच एक कहाणी आहे. आणि मग ते का लपून बसले आहेत याची कहाणी आहे. भारताचे उपराष्ट्रपती अशा स्थितीत का आहेत की ते एक शब्दही बोलू शकत नाहीत… आणि त्यांना लपून बसावे लागते… अचानक, राज्यसभेत इतका आवाज करणारा माणूस पूर्णपणे गप्प झाला आहे.” अशी टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली होती.

Web Title: Vice president jagdeep dhankhar resigns reason is not health political news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • daily news
  • Jagdeep Dhankhar
  • political news

संबंधित बातम्या

शासकीय त्रासदायक कामं सोपी केली..; शासन आपल्या दारी कार्यक्रमात मंत्री बावनकुळेंचे केले कौतुक
1

शासकीय त्रासदायक कामं सोपी केली..; शासन आपल्या दारी कार्यक्रमात मंत्री बावनकुळेंचे केले कौतुक

Baramati By Election : मुख्यमंत्री फडणवीस करणार सुनेत्रा पवारांचा प्रचार; पडळकरांचेही स्टार प्रचारकांमध्ये नाव
2

Baramati By Election : मुख्यमंत्री फडणवीस करणार सुनेत्रा पवारांचा प्रचार; पडळकरांचेही स्टार प्रचारकांमध्ये नाव

Nanded Politics : राजकारणात आली नवी रंगत! विधान परिषदेच्या रिंगणात ‘मोठ्या चेहऱ्यांची’ प्रतिष्ठा पणाला
3

Nanded Politics : राजकारणात आली नवी रंगत! विधान परिषदेच्या रिंगणात ‘मोठ्या चेहऱ्यांची’ प्रतिष्ठा पणाला

Satara News : निलंबनाची मागणी अन् ‘काळे फासू’ इशारा: प्रभाग क्रमांक २३ च्या नागरिकांचा इशारा
4

Satara News : निलंबनाची मागणी अन् ‘काळे फासू’ इशारा: प्रभाग क्रमांक २३ च्या नागरिकांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.