
Amruta Fadnavis on if she made CM for a day answer goes viral on internet
अमृता फडणवीस यांनी एका युटुब चॅनलसाठी मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी अनेक राजकीय, सामाजिक आणि घरगुती विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि घरांच्याचे नाते सांगितले आहे. या मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस यांना एका दिवसासाठी मुख्यमंत्री करण्यात आले तर काय कराल याबाबत प्रश्न विचारण्यात आला. शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या या मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस यांनी मी राजकारणामध्ये येणार नसल्याचे देखील स्पष्टपणे सांगितले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे अमृता फडणवीस म्हणाल्या की, “मी बॅंकिंग क्षेत्रामध्ये आहे. मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. मला गायला सुद्धा खूप आवडतं. पण मला राजकारणामध्ये येण्यामध्ये कोणताही रस नाही. मी राजकारणामध्ये यायला अजिबात उत्सुक नाही. अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एक दिवसासाठी मुख्यमंत्री झालात तर? असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “देवेंद्र फडणवीस यांनी इतके काम केलं आहे की एक दिवसासाठीही मला मुख्यमंत्रिपद मिळेल की नाही माहिती नाही. मुंबईतल्या पायाभूत सुविधा, महाराष्ट्रासाठी आणलेले विविध प्रकल्प, अधिकारी वर्गामधे होणारा भ्रष्टाचार संपवण्यासाठी त्यांनी त्या अधिकाऱ्यांवर वचक ठेवला आहे. तसंच अनेक प्रकल्प त्यांनी करायचं ठरवले आहेत मग तो नदीजोड प्रकल्प असेल किंवा इतर पण तरीही एक दिवसासाठी मी जर मुख्यमंत्री झाले तर भी देवेंद्र फडणवीस आणि दिविजासह एखाद्या छान ठिकाणी जाऊन तो संपूर्ण दिवस घालवेन” असं उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं आहे. अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा