Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM देवेंद्र फडणवीसांनी पर्यटनासाठी तरी बीडला जावं; अंजली दमानिया झाल्या आक्रमक

बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन जोरदार राजकारण तापले आहे. यानंतर अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 26, 2024 | 10:45 AM
Anjali Damania demands that CM Devendra Fadnavis visit Beed for tourism

Anjali Damania demands that CM Devendra Fadnavis visit Beed for tourism

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राजकारण रंगले आहे. तर वाढत्या गुन्हेगारीमुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. बीडमधील हत्या आणि परभणीमध्ये हिंसाचारामुळे नागरिकांनी रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड दौरा करावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

बीडमध्ये गुन्हेगारीचे प्रस्त वाढले आहे. बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणावरुन कोणीही पर्यटन करु नये असा टोला लगावला होता. कॉंग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र दौरा करुन परभणी व बीड प्रकरणावरुन महायुती सरकारवर निशाणा साधला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यटन करु नये अशी टीका केली होती. आता अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावला आहे.

राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन बीडमधील गुन्हेगारीचे अनेक धक्कादायके दावे केले आहेत. आता त्यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. अंजली दमानिया म्हणाल्या आहेत की, यांनी देवेंद्रजींनी पर्यटन म्हणून तरी बीडला एकदा जावे, तेथे त्यांचे आता मित्र झालेल्या धनंजय मुंडे यांची किती दहशत आहे हे एकदा पाहावे, तेथे कोणी आपल्या जमीनीदेखील विकू शकत नाही, असा धक्कादायक दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

त्याचबरोबर बीडमध्ये झालेल्या निर्घुण हत्येच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या शनिवारी 28 तारखेला  बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात काढण्यात येणार आहे. यामध्ये शरद पवार देखील सहभागी होणार आहे. या मोर्चामध्ये आपण देखील सहभागी होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. बीडमधील या मोर्चावर राजकीय वर्तुळामध्ये करडी नजर असणार आहे.

क्राईम न्यूज वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अंजली दमानिया यांनी यापूर्वी देखील अनेक धक्कादायक खुलासे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीबाबत केले आहेत. बीडमधील धक्कादायक परवानाधारक बंदुक वापरणाऱ्यांची संख्या देखील त्यांनी जाहीर केली होती. अंजली दमानिया यांनी लिहिले की, बीडमध्ये पिस्तुलांची थैमान? 1222 शस्त्र परवानधारक? इतक्या प्रचंड प्रमाणात, शस्त्र परवाने का देण्यात आले? परभणीत 32 आहेत तर अमरावती ग्रामीणमध्ये 243 शस्त्र परवाने आहेत. मग बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर का व कोणाच्या वर्धस्ताने? 1222 अधिकृत शास्त्र परवाने मग अनधिकृत किती असतील? वाल्मिक कराड ह्यांच्या नावावर लाइसेंस आहे पण त्यांच्याच गटातले कैलाश फड व निखील फड या दोघांकडे कोणतही लाइसेंस नाही. मी एसपी नवनीत कावत यांना मेसेज पाठवला आहे की त्यांना तात्काळ अटक करावी आणि ह्या कराड गैंगला पहिला दणका द्यावा. या सगळ्या परवान्यांची तत्काळ चौकशी लावा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

Web Title: Anjali damania demands that cm devendra fadnavis visit beed at least for tourism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 10:45 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

Mumbai News: राज्यात बनणार आयकॉनिक शहरे; विविध प्राधिकरणांकडील लँड बँकेचा वापर
1

Mumbai News: राज्यात बनणार आयकॉनिक शहरे; विविध प्राधिकरणांकडील लँड बँकेचा वापर

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
2

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी
3

Ram Sutar यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान! पुरस्कार देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री पोहचले निवास्थानी

Bihar मध्ये ‘एनडीए’ला प्रचंड बहुमत मिळताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदनपर पोस्ट; म्हणाले…
4

Bihar मध्ये ‘एनडीए’ला प्रचंड बहुमत मिळताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदनपर पोस्ट; म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.