Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होताच हालचालींना वेग; अध्यक्षपद खुले असल्याने मातब्बर रिंगणात उतरण्याचे संकेत

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समितीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार ५ फेब्रुवारीला मतदान होणार, तर ७ फेब्रुवारीला निकाल घोषित करण्यात येणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 15, 2026 | 01:23 PM
Vintage political leaders like vintage cars remain spotlight even as they age political news

Vintage political leaders like vintage cars remain spotlight even as they age political news

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका निवडणुकांच्या धामधुमीनंतर आता मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. आचारसंहिताही लागू झाली आहे. आज होत असलेल्या महापालिका मतदानानंतर जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. महापालिका निवडणुकीचे काय निकाल लागतात? यावर झेडपीचे राजकीय गणित ठरणार असल्याने राजकीय वर्तुळाचे महापालिका निकालाकडे लक्ष असणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समितीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार ५ फेब्रुवारीला मतदान होणार, तर ७ फेब्रुवारीला निकाल घोषित करण्यात येणार आहे. या घोषणेसोबतच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली. नऊ वर्षांनंतर निवडणुका होत असल्याने जिल्ह्यातील प्रशासकीयराज संपुष्टात येणार आहे. जिल्ह्यात अंधारी या नव्या गटाची भर पडल्याने गटांची संख्या ६३ वर पोहोचली आहे. त्यानुसार ६३ गट आणि १२६ गणांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

अध्यक्षपदासाठी सर्वाधिक चुरस

जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील पैठण, कन्नड, सिल्लोड, वैजापूर तसेच छत्रपती संभाजीनगर (पश्चिम) या विधानसभा मतदारसंघांचे आमदार शिंदेसेनेचे आहेत, तर गंगापूर-खुलताबाद व फुलंब्री या मतदारसंघाचे आमदार भाजपचे आहेत. आपल्याच मतदारसंघातील कार्यकर्त्यास अध्यक्षपद मिळावे यासाठी शिंदेसेनेचे खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे, रमेश बोरणारे, संजना जाधव, अब्दुल सत्तार, पालकमंत्री संजय शिरसाट, भाजपचे आमदार प्रशांत बंब, अनुराधा चव्हाण यांनी तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील काही तुल्यबळ उमेदवारही स्पर्धेत असल्याचेही बोलले जात आहे.

तीन वर्षांपासून जिल्हा परिषद कार्यकारिणीविना

२०१२ ते २०१७ या पंचवार्षिक कालावधीत सिल्लोड तालुक्यातील भराडी गटाचे श्रीराम महाजन जिल्हा परिषद अध्यक्ष होते. त्यानंतर अॅड. देवयानी डोणगावकर आणि मीना शेळके यांनी अध्यक्षपद भूषवले. मागील तीन वर्षांपासून जिल्हा परिषद कार्यकारिणीविना असून, प्रशासकांच्या ताब्यात आहे. त्यामुळे आणि यंदा अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.

आजी-माजी पदाधिकाऱ्यांना विशेष रस

जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून, इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. सलग ९ वर्षे कारभाऱ्यांशिवाय असलेल्या झेडपीच्या आता राजकीय चुरस होणार आहे. यात सदस्यपद आणि सभापतीसह अध्यक्षपदासाठी सर्वाधिक रस्सीखेच पाहायला मिळेल.

हेदेखील वाचा : Chhatrapati Sambhajinagar Election 2026 : “सकाळी 4 वाजता फोन…, भाजपने पैशाचा पाऊस पाडला”, अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

Web Title: As soon as the zilla parishad elections were announced activities intensified

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी; ‘या’ नेत्याच्या प्रवेशाने मिळाले बळ
1

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी; ‘या’ नेत्याच्या प्रवेशाने मिळाले बळ

भाजपला राहिला नाही त्यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास; बाहेर आणले उमेदवार
2

भाजपला राहिला नाही त्यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास; बाहेर आणले उमेदवार

Maharashtra Politcs: प्रचार थांबला, पण राजकारण पेटलं! पुण्यनगरीत छुप्या प्रचाराचा ‘काळा खेळ’ उघड
3

Maharashtra Politcs: प्रचार थांबला, पण राजकारण पेटलं! पुण्यनगरीत छुप्या प्रचाराचा ‘काळा खेळ’ उघड

Maharashtra Politics: “रात्र वैऱ्याची आहे,तर…”; बाळा नांदगावकरांची मतदानाआधी भावनिक पोस्ट
4

Maharashtra Politics: “रात्र वैऱ्याची आहे,तर…”; बाळा नांदगावकरांची मतदानाआधी भावनिक पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.