Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्वतःच्या रक्ताशी गद्दारी करत नाही ना?’, संविधान हत्या दिनाच्या पोस्टवरून काँग्रेसचा अशोक चव्हाणांना टोला

संविधान हत्या दिनानिमित्त भाजप नेते अशोक चव्हाण यांनी केलेल्या पोस्टनंतर काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. शंकरराव चव्हाणांच्या वारशाचा उल्लेख करत काँग्रेसने सोशल मीडियावरून प्रत्युत्तर दिले.

  • By विवेक
Updated On: Jun 25, 2026 | 09:02 PM
संविधान हत्या दिनाच्या पोस्टवरून काँग्रेसचा अशोक चव्हाणांना टोला

संविधान हत्या दिनाच्या पोस्टवरून काँग्रेसचा अशोक चव्हाणांना टोला

Follow Us
Follow Us:

25 जून 1975 रोजी तत्कालीन सरकारने देशात आणीबाणी लागू केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या सरकारच्या म्हणण्यानुसार, त्या काळात सत्तेचा गैरवापर झाला आणि सामान्य नागरिकांना अन्याय व दडपशाहीचा सामना करावा लागला. म्हणूनच, केंद्र सरकारने 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित केला आहे.

यावरूनच आता आधीचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि आता भाजप मध्ये प्रवेश केलेले अशोक चव्हाण यांनी सोशल मीडिया पोस्ट टाकून याविषयी भाष्य केले आहे. यावरून मोठा गदारोळ उडाला असून आता काँग्रेसकडून अशोक चव्हाणांवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

‘आणीबाणी म्हणजे भारतीय लोकशाहीची निर्दय गळचेपी’; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर अप्रत्यक्ष हल्ला

अशोक चव्हाण यांची ‘संविधान हत्या दिन‘ बाबत X पोस्ट

अशोक चव्हाण यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून पोस्ट करत लिहिले कि, “लोकशाहीचा श्वास आणि संविधानाचा पाया मजबूत ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आज आपण सर्व मिळून संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी एकजुटीने उभे राहण्याचा संकल्प करूया.” यावेळी त्यांनी #संविधानहत्यादिवस असा हॅशटॅगही वापरला.

लोकशाहीचा श्वास आणि संविधानाचा पाया मजबूत ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आज आपण सर्व मिळून संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी एकजुटीने उभे राहण्याचा संकल्प करूया.#SamvidhanHatyaDiwas pic.twitter.com/Dgme6HqxEP — Ashok Chavan (@AshokChavan1958) June 25, 2026

काँग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर

अशोक चव्हाणांच्या ट्विटर पोस्टनंतर काँग्रेसच्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले. “मा. अशोकराव, ज्या कालखंडाचा आपण निषेध करताय, त्यावेळी आपले वडील कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. शंकरराव चव्हाण साहेब हे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री ही होते. लोकशाही व संविधान विरोधी कोण आहे, हे सर्व भारतीयांना दिसतच आहे पण संघ-भाजपचा खोटा अजेंडा राबवताना आपल्याच रक्ताशी आपण गद्दारी करत नाही ना, हे ही स्वतःला एकदा विचारून बघा,” अश्या शब्दात अशोक चव्हाणांवर टीका करण्यात आली.

मा. अशोकराव,
ज्या कालखंडाचा आपण निषेध करताय, त्यावेळी आपले वडील कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. शंकरराव चव्हाण साहेब हे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री ही होते. लोकशाही व संविधान विरोधी कोण आहे, हे सर्व भारतीयांना दिसतच आहे पण संघ-भाजपचा खोटा अजेंडा… https://t.co/OMT5vUgLa8
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 25, 2026

पंतप्रधान मोदींचेही मोठे विधान

पंतप्रधान मोदींनीही ‘संविधान हत्या दिन‘ चा उल्लेख करत ‘X ‘ पोस्ट केली. त्यात ते म्हणाले, “”आज आपण अशा सर्व व्यक्तींना आदरांजली अर्पण करत आहोत ज्यांनी भारताच्या इतिहासातील एका अत्यंत काळ्या अध्यायात – म्हणजेच ‘आणीबाणी’च्या काळात – लोकशाही मूल्यांचे खंबीरपणे रक्षण केले. आणीबाणी हा आपल्या संविधानावर झालेला थेट आघात होता. या काळात नागरी स्वातंत्र्ये स्थगित करण्यात आली, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने घालण्यात आली, तसेच राजकीय नेते, पत्रकार आणि समाजसेवक यांना अटक करण्यात आली; इतकेच नव्हे तर आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या संस्थांवरही प्रहार करण्यात आला.”

Operation Tiger : ऑपरेशन टायगर यशस्वी; सहा खासदारांच्या फोडाफोडीत फडणवीसांची शिष्टाई ठरली निर्णायक

ते पुढे म्हणाले, “या काळात असंख्य नागरिकांनी दाखवलेले असाधारण धैर्यही दिसून आले; ज्यांनी गप्प राहण्यास नकार दिला आणि आपल्या संविधानातील आदर्शांची जोपासना केली. आपल्या सर्वांसाठी, आपले संविधान हे १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा, अधिकार आणि कर्तव्यांचे प्रतीक आहे. घटनात्मक मूल्यांचे रक्षण करण्याच्या आपल्या सामूहिक कटिबद्धतेचा आपण पुनरुच्चार करतो. संविधानाच्या भावनेने प्रेरित होऊन, आपण असा भारत घडवू जो न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांच्यासाठी सदैव कटिबद्ध राहील.”

Web Title: Ashok chavan post on samvidhan hatya diwas congress reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 08:57 PM

Topics:  

  • ashok chavhan
  • Congress
  • Indian Constitution

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
2

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र
3

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र

‘साधू-संतांचा अपमान केल्यास तुरुंगवास’; सुवेंदू अधिकारींचा इशारा, म्हणाले- ‘टिळा, शेंडी, धोतर आणि तुळशीचं सरकार’
4

‘साधू-संतांचा अपमान केल्यास तुरुंगवास’; सुवेंदू अधिकारींचा इशारा, म्हणाले- ‘टिळा, शेंडी, धोतर आणि तुळशीचं सरकार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.