Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Politics: बारामती नगर परिषदेत विकासकामांना ‘बूस्टर डोस’! रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांना मालमत्ता करात १०% सवलत

विरोधी पक्षनेत्या आरती शेंडगे यांनी शहरातील गरीब घटकातील नागरिकांना घरपट्टीची रक्कम भरता येत नाही, त्यामुळे घरपट्टी व शास्ती ची रक्कम वाढवण्यापेक्षा नगरपालिकेत चे उत्पन्नाचे स्त्रोत आणखी वाढवावेत,

  • By anuradha sagar
Updated On: Jun 13, 2026 | 08:01 PM
Baramati Politics: बारामती नगर परिषदेत विकासकामांना ‘बूस्टर डोस’!  रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांना मालमत्ता करात १०% सवलत
Follow Us
Follow Us:
  • बारामती नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी
  • सोलर व रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांना मालमत्ता करात १० टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते शाहू महाराज चौक या मार्गावर हॉकर्स झोन करण्याच्या ठरावाला देखील मंजुरी
 

Baramati Politics: बारामती नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देत यामध्ये विविध विकास कामांना बूस्टर डोस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेत, काही नगरसेवकांनी एकमेकांना चिमटे घेत, तर अनेक वेळा कोपरखळी मारत विविध मुद्द्यांवर लक्ष वेधले

शहरात सोलर व रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्यांना मालमत्ता करात १० टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयसह शहरातील वाढीव रस्ते, रेल्वे अंडरपास, दशक्रिया विधी घाट, आधुनिक स्वच्छतागृहे तसेच नियोजित सायन्स पार्कसाठी रस्ता तसेच शहरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासह इतर महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर नगरसेविका संघमित्रा चौधरी यांनी अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणास विरोध करण्याच्या ठरावाला देखील मंजुरी देण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते शाहू महाराज चौक या मार्गावर हॉकर्स झोन करण्याच्या ठरावाला देखील मंजुरी देण्यात आली.

 

Purandar Airport भूसंपादनाला ३० जूनपर्यंत मुदतवाढ! सात गावांतील शेतकऱ्यांच्या मागणीनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

नगरसेवक नीलेश इंगुले यांनी नगरपालिकेच्या मालकीच्या गाळे घरपट्टी माफ व्हावी ,गावठाणात पाणीपट्टी वाढवू नये व पाणी मीटर बसू नये, वाणी समाजाला दफनभूमी साठी जागा द्यावी,बसवेश्वर महाराजांचा पुतळा उभारावा ,शववाहीका बारामतीकरांसाठी फ्री करावी ,मुस्लिम समाजाचा शादीखाना पूर्ण कामे करून हस्तांतर करावा या मागण्या मांडल्या. विरोधी पक्षनेत्या आरती शेंडगे यांनी शहरातील गरीब घटकातील नागरिकांना घरपट्टीची रक्कम भरता येत नाही, त्यामुळे घरपट्टी व शास्ती ची रक्कम वाढवण्यापेक्षा नगरपालिकेत चे उत्पन्नाचे स्त्रोत आणखी वाढवावेत, तसेच नगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे, अशी सूचना मांडली.

नगरसेवक बाळासाहेब जाधव यांनी मालमत्ता धारकांकडून बाकी पूर्ण वसूल न झाल्याने अंदाजपत्रक कोलमडले जाईल, अशी भीती व्यक्त केली, यावर नगराध्यक्ष सातव यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न केल्याने घरपट्टी समाधानकारक वसूल झाल्याचे सांगितले. नगरसेवक सुनील सस्ते यांनी घरपट्टी बाबत नागरिकांना सहकार्य करावे अशी सूचना मांडली. रेन वॉटर हार्वेस्टिंग च्या विषय महत्वाचा असून हे राबवणाऱ्या मालमत्ता धारकांना करा मध्ये दहा टक्के सवलत द्यावी, अशी मागणी जय पाटील यांनी करून हा विषयाबाबत नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांचे कौतुक केले.

Junnar Gram Panchayat Election: राजुरी ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर! १७ सदस्यांच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट; प्रभागनिहाय आरक्षण

नगरसेविका भारती शेळके यांनी नगरपालिका हद्दीत आरक्षण टाकण्यापूर्वी त्या जागेची पाहणी अगोदर करावी, सूचना मांडली. नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांनी बीजगुणन क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या गार्डनमध्ये सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांबरोबर राजमाता जिजाऊ व माता रमाई यांचे पुतळे उभारण्यात यावेत, अशी सूचना मांडली. नगरसेवक अमर धुमाळ यांनी शाहू महाराज यांचा पुतळा देखील त्या ठिकाणी उभारावा अशी सूचना मांडली. दर्शना तांबे यांनी देवळे इस्टेट मध्ये नवीन स्मशानभूमीची गरज नसल्याचे सांगितले. अनुप्रिता ताबे यांनी वीरशैव समाजाला दफनभूमीसाठी जागा द्यावी अशी मागणी केली.

नगरसेविका आफ्रीन बागवान अजितदादांनी मुस्लिम समाजासाठी शादीखाना बांधून दिला, त्याबद्दल ऋण व्यक्त केले. नगरसेवक सोमनाथ गजाकस यांनी स्ट्रीट लाईट चे खांब पडल्याबद्दल या कामाच्या दर्जाबद्दल शंका उपस्थित केली. गटनेते संजय संघवी यांनी बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर बसणाऱ्या पथविक्रेत्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. ‘

Katraj Dairy Pune: कात्रज दूध संघाच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू! कथित आर्थिक गैरव्यवहार आणि बोगस दूध संकलनाचे गंभीर आरोप

नगरसेविका आरती शेंडगे यांनी यावेळी अतिक्रमण विभागाचा अधिकारी विक्रेत्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेत असल्याचा आरोप करत याबाबत एका विक्रेत्याचे रेकॉर्डिंग देखील त्यांनी ऐकवले. नगरसेवक राजेंद्र सोनवणे यांनी ३० कोटी रुपये हून अधिक मालमत्ता कर वसुली केल्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला. यावेळी विशाल हिंगणे, अभिजीत चव्हाण, पुनम सातकर, अश्विनी सातव, संपदा चौधर,राहुल वाघोलीकर, अल्ताफ सय्यद, विष्णुपंत चौधर, गोरख पारसे यांनी विविध सूचना मांडल्या.

 

Web Title: Baramati municipal council approves 10 property tax rebate for solar rainwater harvesting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • Baramati Politics

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.