
आदित्य ठाकरे Aditya Thackeray म्हणाले की, “आमचे आमदार सुनील गोविंद शिंदे यांचे नाव मतदार यादीत सात वेळा आले आहे. प्रत्येक नोंदीमध्ये वय आणि फोटो वेगळे आहेत, पण नाव सात वेळा आहे. तर माजी महापौर श्रद्धा जाधव यांचे नाव आठ वेळा आढळून आले आहे. निवडणूक आयोग, तुम्ही सर्कस करत आहात का?” असा थेट सवाल आदित्य ठाकरे यांनी
आदित्य ठाकरे म्हणाले, ” मुंबई महापालिकेची (BMC)20 नोव्हेंबरला जाहीर झालेली प्रारूप मतदार यादी मोठ्या गोंधळाला कारणीभूत ठरली आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाची भेट घेऊन पत्र सादर केले असून, अतिरिक्त वेळही मागण्यात आला आहे, आम्ही स्वतः शाखा पातळीवर जाऊन यादीतील त्रुटींवर काम करत आहोत. मुंबईत 227 वॉर्ड आहेत. त्यामधील 3 ते 4 हजार आक्षेप आमच्याकडून नोंदवले गेले आहेत. पण काही ठिकाणी बॅग घेऊन येणाऱ्यांवर संशय आहे; त्यात पैसे आहेत की धमक्या दिल्या जात आहेत, हे स्पष्ट नाही,” असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “या दुबार नोंदींपैकी मराठी मतदारांची संख्या मोठी आहे. पुढील दोन दिवस आमच्याकडे आहेत आणि आम्ही आक्षेप नोंदवत आहोत. मात्र BLO म्हणून असे लोक येत आहेत ज्यांना लिहिता-वाचता येत नाही. यादी वाचता येत नाही, ते कसे तपासणी करणार?” ठाकरे यांनी निवडणूक प्रशासनावर तिखट शब्दांत टीका केली आहे. “5 लाख 86 हजार लोकांची दुबार मतदार म्हणून नोंदणी आहे. काहींची नावे दुबार आहेत, पण त्यांच्या समोर स्टार चिन्ह नाही. मृत मतदारांचे डेथ सर्टिफिकेट देऊनही त्यांची नावे यादीत कायम आहेत. त्यांच्या नावावर प्रॉक्सी मतदान तर होत नाही ना, याचे उत्तर कोण देणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“या संदर्भात आम्ही पत्र दिले आहे, मात्र आता यासाठी एक जनचळवळ उभी करू. 1 जुलै 2025 नंतर कोणतेही नाव मतदार यादीत समाविष्ट होऊ शकत नाही, परंतु सद्य यादीत 33 हजार नवे नावं आढळत आहेत, अशी गंभीर शंका आम्ही उपस्थित करत असल्याचेही त्यांनी नमुद केले.