Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Election: मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी दबाव वाढला, लालू यादवांनी सुरू केला नवा पक्ष; कशी झाली RJDची सुरुवात?

२००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीतही राजदने काँग्रेससोबत युती कायम ठेवली आणि २४ लोकसभा जागा जिंकल्या. यूपीए सरकारचा भाग बनलेल्या राजदला केंद्रात महत्त्वाचे स्थान मिळाले आणि लालू प्रसाद यादव यांची रेल्वेमंत्रीपदी नियुक्ती झाल

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 27, 2025 | 04:39 PM
Bihar Election 2025:

Bihar Election 2025:

Follow Us
Close
Follow Us:
  • लालू प्रसाद यादव यांनी ५ जुलै १९९७ रोजी राष्ट्रीय जनता दलाची स्थापना केली
  • १९९७ मध्ये चारा घोटाळ्याचे आरोप
  • लालू प्रसाद यादवांचा राजीनामा, राबडी देवी मुख्यमंत्रीपदी विराजमान
Rashtriya Janata Dal:बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी ५ जुलै १९९७ रोजी राष्ट्रीय जनता दलाची स्थापना केली. १९९० ते २००५ पर्यंत या काळात राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) बिहारवर राज्य केले. या काळाला “लालू-राबडी युग” असेही म्हटले जाते. पक्षाची मुख्य विचारसरणी “सामाजिक न्याय” असून मुस्लिम आणि यादव समुदाय हा आरजेडीची पारंपारिक मतपेढी राहिली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील आरजेडी पक्ष देशातील प्रमुख प्रादेशिक पक्षांपैकी एक आहे. आरजेडीच्या नेतृत्त्वात बिहारमध्ये तीन वेळा सरकार स्थापन करण्यात आले. २००८ मध्ये आरजेडीला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली. पण अवघ्या दोन वर्षातच आरजेडीने २०१० मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला.

२०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत, आरजेडी नितीश कुमार यांच्या पक्ष, जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि काँग्रेससोबत “महाआघाडी” स्थापन करून सत्तेत परतला. या निवडणुकीत, ८० जागा जिंकून राजद सर्वात मोठा पक्ष बनला. २०१७ मध्ये जेडीयू एनडीएमध्ये परतल्यानंतर हे सरकार कोसळले.

Bihar Elections 2024: बिहारच्या ‘या’ उमेदवाराचं राजेशाही स्वागत! लाडुंनी तुळा तर शेकडो लीटरचा दुग्धाभिषेक

२०२० च्या निवडणुकीत राजदने ७५ जागा जिंकल्या

२०२० च्या विधानसभा निवडणुकीत, तेजस्वी यादव यांनी लालू यादव यांच्या अनुपस्थितीत पक्षाचे नेतृत्व केले. राजद ७५ जागा जिंकून पुन्हा एकदा राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला, परंतु ‘महाआघाडी’ बहुमतापासून कमी पडली. सध्या, राजद बिहारमध्ये मुख्य विरोधी पक्ष म्हणून काम करते आणि ‘महाआघाडी’चे नेतृत्व करते.

राजद’ची स्थापना कशी झाली?

१९९७ मध्ये चारा घोटाळ्यात सहभागी झाल्यानंतर, जनता दलाच्या आतून आणि बाहेरून लालू प्रसाद यादव यांच्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव वाढू लागला होता. या राजकीय संकटाच्या काळात, ५ जुलै १९९७ रोजी, पप्पू यादव, रघुवंश प्रसाद सिंह, मोहम्मद शहाबुद्दीन, अब्दुल बारी सिद्दीकी, कांती सिंग, मोहम्मद तस्लीमुद्दीन आणि मोहम्मद अली अश्रफ फातमी यांच्यासह १७ लोकसभा आणि ८ राज्यसभेचे खासदार नवी दिल्लीत एकत्र आले आणि त्यांनी जनता दलापासून वेगळे होऊन राष्ट्रीय जनता दल या नवीन पक्षाची स्थापना केली. लालू प्रसाद यादव हे आरजेडीचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडून आले. हा पक्ष मध्य-डाव्या विचारसरणीवर आधारित आहे.

Bihar Assembly Election 2025: बिहारचे ६ जिल्हे निवडणुकीशिवाय झाले भाजपमुक्त; नेमकं काय आहे यामागची खरी रणनीती?

लालू यादव यांच्या राजीनाम्यानंतर राबडी देवी यांचा राज्याभिषेक

२५ जुलै १९९७ रोजी, वाढत्या दबावाखाली, लालू प्रसाद यादव यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.  त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या पत्नी राबडी देवी यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले, ज्यामुळे पक्षात नेतृत्व टिकून राहिले आणि सत्तेवरची पकड कायम राहिली.

सुरुवातीची निवडणूक कामगिरी

मार्च १९९८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत, आरजेडीने चांगली कामगिरी केली, बिहारमध्ये १७ लोकसभा जागा जिंकल्या, परंतु इतर राज्यांमध्ये त्यांचा प्रभाव मर्यादित होता. त्याच वर्षी, पक्षाने भारतीय जनता पक्षाविरुद्ध समाजवादी पक्षासोबत धर्मनिरपेक्ष युती केली, जी अपेक्षित पाठिंबा मिळवू शकली नाही. १९९९ च्या निवडणुकीत पक्षाला फक्त ७ जागा मिळाल्या.

Bihar elections 2025: “शंभर शहाबुद्दीन आले तरी…” अमित शहा यांचा बिहारमध्ये जाऊन लालूंच्या कुटुंबावर हल्लाबोल

– काँग्रेसशी युती आणि यूपीएमध्ये सामील होणे

१९९९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने (राजद) काँग्रेसशी युती करून निवडणुका लढवल्या, परंतु या निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्यासह पक्षाला फटका बसला आणि १० जागांचा तोटा सहन करावा लागला. तथापि, २००० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत राजदने चांगली कामगिरी केली. काँग्रेससोबत निवडणूकोत्तर युती करून त्यांनी बहुमत मिळवले आणि सत्ता स्थापन केली.

२००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीतही राजदने काँग्रेससोबत युती कायम ठेवली आणि २४ लोकसभा जागा जिंकल्या. यूपीए सरकारचा भाग बनलेल्या राजदला केंद्रात महत्त्वाचे स्थान मिळाले आणि लालू प्रसाद यादव यांची रेल्वेमंत्रीपदी नियुक्ती झाली.

सत्ता गमावल्यानंतर घसरणीचा आलेख

फेब्रुवारी २००५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत राजदला सत्तेवरून गमवावे लागले. पक्ष केवळ ७५ जागांवरच विजयी झाला. त्याच वर्षी झालेल्या पुनर्निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही आणि राजदची ताकद आणखी घटून ५४ जागांवर आली.

Bihar Election 2025: ‘जब लालू जी नहीं डरे तो बेटवा डरेगा…’; तेजस्वी यादवांचा थेट मोदी-शाहांवर घणाघात

२००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जागावाटपावरून मतभेद निर्माण झाल्याने राजदने यूपीएपासून विभक्त होत लोक जनशक्ती पक्ष आणि समाजवादी पक्षासोबत “चौथा मोर्चा” स्थापन केला. मात्र या आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही आणि राजदला केवळ चार जागांवर विजय मिळवता आला.

लोकसभा निवडणुकांमधील पराभवांची मालिका

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजद पुन्हा यूपीएमध्ये सामील झाला आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत बिहारमधील ४० जागांवर लढला. राजदने २७ जागांवर उमेदवार उभे केले, परंतु केवळ चार जागांवरच विजय मिळवता आला.

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राजदने २३ जागांवर लढवलेले उमेदवारांपैकी फक्त चार जिंकले. त्याचप्रमाणे, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही परिस्थितीत काही बदल झाला नाही — एकूण २३ जागांवर लढून राजदला पुन्हा केवळ चारच जागांवर यश मिळाले.

 

Web Title: Bihar election 2025 how lalu yadav founded the rashtriya janata dal what is the history of rjd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 04:39 PM

Topics:  

  • Bihar Election 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.