Bihar Election 2025: 'जब लालू जी नहीं डरे तो बेटवा डरेगा...'; तेजस्वी यादवांचा थेट मोदी-शाहांवर घणाघात
Bihar Assembly Election 2025: बिहारचा आगामी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून आरजेडी नेते तेजस्वी यादव यांची घोषणा कऱण्यात आली. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बिहार निवडणूक प्रभारी अशोक गेहलोत यांनीदेखील एका कार्यक्रमात तेजस्वी यादव यांच्या नावाची पुष्टी केली.
महाआघाडीने बिहारमध्ये तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून आणि व्हीआयपी प्रमुख मुकेश साहनी यांना उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केले आहे. अशोक गेहलोत यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि राजद यांच्यात निर्माण झालेले मतभेदही दूर झाले आहेत.
Jaysingpur Murder Case : जयसिंगपुरातील निर्घृण खुनाचा उलगडा; चार आरोपींना पोलिसांनी पकडले
दरम्यान, महाआघाडीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ शुक्रवारी (२४ ऑक्टोबर २०२५) आयोजित निवडणूक रॅलीत राजद नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तेजस्वी यादव म्हणाले, “आम्ही बिहारी आहोत आणि बाहेरून आलेल्या लोकांना घाबरत नाही. गुजरातमधून दोन लोक आले आहेत आणि बिहार चालवत आहेत. बिहार बिहारी चालवेल की बाहेरील?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
एनडीएवर निशाणा साधताना ते म्हणाले, “गेल्या २० वर्षांत या लोकांनी बिहारसाठी काय केलं? बेरोजगारी आणि स्थलांतर सर्वाधिक आहे. ते आमच्या घोषणांची नक्कल करत आहेत. आम्ही गुजरातमध्ये कारखाने उभारू, पण आम्हाला बिहारमध्ये विजय हवा आहे.” जब लालू जी नहीं डरे तो बेटवा डरेगा… अशा आपल्या बिहारी शैलीत बोलत तेजस्वी यादव यांनी केंद्रतील मोदी सरकारला आव्हान दिले आहे.
“१४ तारखेला लक्षात ठेवा, त्या दिवशी तुमचे महाआघाडीचे सरकार स्थापन होईल,” असा ठाम दावा तेजस्वी यादव यांनी निवडणूक सभेत केला. एनडीए सरकारवर निशाणा साधत बिहारच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासनही दिले.
तामिळनाडूमध्ये SIT कधी सुरू होईल? निवडणूक आयोगाने न्यायालयाला दिली माहिती
तेजस्वी यादव म्हणाले, “आमच्या सरकारनंतर हे लोक एकही भरती मोहीम राबवू शकले नाहीत. आमचे स्वप्न आहे की बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यात कारखाने सुरू व्हावेत, चांगली रुग्णालये आणि शाळा उभ्या राहाव्यात. आम्ही महागाई कमी करू, नोकऱ्या उपलब्ध करून देऊ आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू.”
यादव यांनी सांगितले की, सरकार स्थापन झाल्यानंतर २० महिन्यांच्या आत कोणतेही कुटुंब सरकारी नोकरीशिवाय राहणार नाही. त्यांनी जनतेला पाठिंबा देण्याचे आवाहन करताना काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यांनी सांगितले की, गॅस सिलिंडरची किंमत १,००० रुपयांवरून ५०० रुपयांपर्यंत कमी केली जाईल. तसेच “माई बहेन” योजना सुरू करून दरमहा २,५०० रुपये माता आणि बहिणींच्या खात्यात जमा केले जातील. याशिवाय एका वर्षासाठी ३०,००० रुपयांची एक-वेळ ठेव देखील दिली जाईल.






