
Bihar Assembly Election 2025:
Nitish Kumar Resign: विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. बिहारच्या यंदाच्या निवडणुकीतच भाजपला ८९ जागा तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला ८५ जागा मिळाल्या. त्यानंतर राज्यात कुणाचा मुख्यमंत्री विराजमान होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अशातच आज नितीश कुमार यांनी राजभवनात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना आपला राजीनामा सादर केला. आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची औपचारिक बैठक झाली. सध्याच्या नितीश मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक होती, ज्यामध्ये मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री नितीश कुमार शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी पटनातील जुन्या सचिवालयात पोहोचले. मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर, नितीश कुमार राजभवनात गेले आणि त्यांनी औपचारिकपणे राज्यपालांना आपला राजीनामा सादर केला. मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा २० नोव्हेंबर रोजी शपथ घेण्याची अपेक्षा आहे. पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांच्या नावाची औपचारिक पुष्टी होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. १८ नोव्हेंबर रोजी होणारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक आता बुधवार, १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्या विधानानंतर, मंगळवारी होणाऱ्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवीन नेता निवडला जाईल आणि त्यानंतर त्यांच्या आघाडीतील भागीदारांना मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांना पाठिंबा देण्याचे औपचारिक पत्र सादर केले जाईल असे मानले जात होते. परंतु आता ही बैठकीसाठी वाट पाहावी लागणार आहे.
Bihar Politics: रोहिणी आचार्य यांच्यापाठोपाठ लालू प्रसाद यादव
१७ वी विधानसभा विसर्जित झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केला. आता ते दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. माध्यमांच्या माहितीनुसार, राजीनामा सादर केल्यानंतर नितीश कुमार आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेण्याची शक्यता आहे.
नवीन सरकार स्थापन होईपर्यंत नितीश कुमार कार्यवाहक मुख्यमंत्री
नवीन सरकार स्थापन होईपर्यंत नितीश कुमार कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. दरम्यान, बिहार मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी ते विजय चौधरी आणि सम्राट चौधरी यांच्यासह रवाना झाले. दोन्ही नेते बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर सम्राट चौधरी हेही नितीश कुमार यांच्यासोबत राजभवनात गेले.