Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात
सरकार स्थापनेच्या सूत्रानुसार, चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास पासवान) दोन मंत्रीपदे, जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) एक आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana Update: …तर लाडकी बहीण योजेनेचे पैसे मिळणे बंद होणार; राज्य सरकारचा इशारा
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनडीए घटक पक्षांमध्ये सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरू आहे आणि अनेक माजी मंत्र्यांच्या खात्यांचाही विचार केला जात आहे.निवडणूक निकालानंतर आज जेडीयूची बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपालांना भेटून राजीनामा देण्यची शक्यता निर्माण वर्तवण्यात येत आहे. तर मंगळवारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक अपेक्षित आहे.
२४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकत आघाडी घेतली आहे. दुसऱ्या क्रमांकावर जेडीयू असून त्यांनी ८५ जागा जिंकल्या. एलजेपी (आरएलडी) ला १९, एचएएम (एस) ला ५ आणि आरजेडीला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. २०२० मध्ये भाजपने ७४ तर जेडीयूने ४३ जागा जिंकल्या होत्या. त्या वेळी सरकारमध्ये भाजपचे २२ आणि जेडीयूचे १२ मंत्री होते.
सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे शपथविधी सोहळा बुधवार किंवा गुरुवारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी सरकार स्थापनेबाबत प्राथमिक चर्चा केली.
Earthquake In Ladakh: लडाखमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के! शेजारी देशही हादरला, किती झाले नुकसान?
नितीश कुमार हे दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता आहे. मात्र, उपमुख्यमंत्रीपदाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावरचे भ्रष्टाचारासंबंधी आरोप आणि उमेदवारी अर्जातील अनियमितता यामुळे त्यांची पुनर्नियुक्ती होईल की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे.
नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पाटण्यातील गांधी मैदानात होण्याची दाट शक्यता आहे. २०१५ मध्येही नितीश कुमार यांनी याच मैदानात शपथ घेतली होती. १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान गांधी मैदान सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आले असून शपथविधीसाठी भव्य स्टेज उभारण्याची तयारी सुरू आहे.
Ans: भाजपने ८९ जागा जिंकून आघाडी घेतली, तर जेडीयूने ८५ जागा जिंकल्या.
Ans: एनडीएमध्ये भाजप, जेडीयू, लोक जनशक्ती पक्ष (रामविलास), हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा हे घटक पक्ष सहभागी आहेत.
Ans: होय, नितीश कुमार हे दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.






