Bihar Elections: यादवच करणार यादवांचा गेम; भाजपने 'तेजस्वी'विरुद्ध थेट..., राघोपुरमध्ये रंगणार महामुकाबला
बिहारमध्ये भाजपकडून दुसरी यादी जाहीर
राघोपुरमध्ये दिली सतीश कुमार यादवांना तिकीट
14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार
BJP Candidate List in Bihar: बिहारमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. दोन टप्प्यात ही विधानसभा निवडणूक होणार आहे. दरम्यान भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने आपल्या 101 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या आणि अखेरच्या टप्यात 18 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राघोपुरमधून सतीश कुमार यादव यांना तिकीट देण्यात आले आहे.
राघोपुर हा तेजस्वी यादव यांचा बालेकिल्ला समजला जातो. दरम्यान हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. या मतदारसंघामध्ये सतीश कुमार यादव यांना तिकीट देण्यात आले आहे. भाजपने पहिल्या यादीमध्ये 71 दुसऱ्या यादीमध्ये 12 आणि शेवटच्या यादीतमध्ये 18 उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने आपल्या 101 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
एनडीए समर्थित जदयू ने अपने उम्मीदवारों की घोषणा की है। सभी को बहुत-बहुत बधाई और जीत की अग्रिम शुभकामनाएँ। मिलकर बनाएंगे विकसित और समृद्ध बिहार! Janata Dal (United) #आएगी_NDA pic.twitter.com/QCd1FA9QTb — BJP Bihar (@BJP4Bihar) October 16, 2025
राघोपुरमध्ये रंगणार महामुकाबला
बिहार विधानसभा निवडणूक रंगतदार होणार आहे. राघोपुर मतदारसंघाची निवडणूक जोरदार होणार आहे. राजद पक्षाचे तेजस्वी यादव आणि भाजपचे सतीश कुमार यादव यांच्यात लढत होणार आहे. यामुळे येथील राजकारण तापले आहे. या ठिकाणी जोरदार लढत पाहायला मिळणार आहे.
बिहार विधानसभेची घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. भाजपप्राणित एनडीए आणि अन्य विरोधी पक्ष अशी ही लढत होणार आहे. दरम्यान बिहारमध्ये आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील मैदानात उतरला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बिहारमध्ये ऑपरेशन त्रिशूळ राबवत असल्याचे समोर आले आहे. तसेच एनडीएचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार यासाठी संघाची भूमिका महत्वाचा समजली जात आहे.
बिहारमध्ये एनडीएची सत्ता आल्यास कोण मुख्यमंत्री होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालणार का हे पहावे लागणार आहे. कारण भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या असल्या तरी नितीश कुमार हे मुख्यमंत्री झाले होते.
बिहारचे काय आहे समीकरण?
बिहार विधासभेमध्ये एकूण 243 मतदारसंघ आहेत. बिहारमध्ये सत्ता येण्यासाठी 123 जागा जिंकून येण्याची गरज असते. एनडीए विरुद्ध विरोधी पक्ष अशी लढत यंदा होणार आहे. विधानसभा निवडणूक 2 टप्प्यात होणार आहे. तर 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.