Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बार्शी नगरपरिषदेवर महायुतीचा झेंडा! नगराध्यक्षपदावर भाजप उमेदवार तेजस्विनी कथले विजयी

बार्शी नगरपरिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या निर्मला बारबोले यांचा पराभव करत भाजप उमेदवार तेजस्विनी कथले विजयी झालीत आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 21, 2025 | 08:40 PM
बार्शी नगरपरिषदेवर महायुतीचा झेंडा!

बार्शी नगरपरिषदेवर महायुतीचा झेंडा!

Follow Us
Close
Follow Us:
  • बार्शी नगरपरिषदेत भाजप उमेदवार विजयी
  • नगराध्यक्षपदावर तेजस्विनी कथले विजयी
  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या निर्मला बारबोले यांचा पराभव
बार्शी नगरपरिषदेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत अखेर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने 23 जागा जिंकत सत्ता कायम राखली. तर विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्या गटाने 19 जागा जिंकून चांगलीच लढत दिली.

नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या तेजस्विनी कथले यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या निर्मला बारबोले यांचा 4,688 मतांनी पराभव करत नगराध्यक्षपद काबीज केले.

शासकीय धान्य गोदाम येथे 21 प्रभागांतील 42 नगरसेवक तसेच थेट नगराध्यक्षपदासाठी रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली. 12 टेबलांवर 11 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडली. सर्व प्रभागांचे निकाल निवडणूक निर्णय अधिकारी अमोल सिंह भोसले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तैमूर मुलाणी आणि राज्य निवडणूक निरीक्षक विक्रमसिंह देशमुख यांनी जाहीर केले.

Solapur BJP Defeat: खासदारांची जादू चालली, पालकमंत्र्यांची लुडबुड संपली; सोलापूरच्या निकालाने भाजपचा गेम ओव्हर

सुरुवातीपासूनच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. मात्र विद्यमान नगरसेवक ॲड. महेश जगताप आणि रोहित लाकाळ यांना पराभवाचा सामना करावा लागला.

बार्शी शहरातील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये माजी विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी 863 मतांच्या फरकाने एकतर्फी विजय मिळवला. तर प्रभाग 19 मध्ये भाजपचे भारत पवार यांना केवळ 7 मतांनी निसटता विजय मिळाला. प्रभाग 7 मध्ये भाजप–शिवसेना युतीचे उमेदवार संदेश काकडे यांनी सुमारे 2,500 मतांच्या सर्वाधिक फरकाने विजय मिळवत आपली जागा कायम राखली. दरम्यान, प्रभाग 7 मधून युतीच्या उमेदवार मीरा नाळे या यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या.

थेट नगराध्यक्षपदासाठी शहरातील सर्व 21 प्रभागांतील मतदान केंद्रांमधून भाजपच्या तेजस्विनी कथले यांना एकूण 35,879 मते, तर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या निर्मला बारबोले यांना 31,191 मते मिळाली. कथले यांनी बारबोले यांचा 4,688 मतांनी पराभव केला.

Sanjay Raut Press Confernce : निवडणुकीमध्ये पैशांची गारपीट…! तेच मशीन सेटिंग अन् तोच आकडा; संजय राऊतांचा चढला पारा

प्रभाग 6 मध्ये माजी नगराध्यक्ष कादर तांबोळी यांच्या कन्या व माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांच्या सून ताहिरा तांबोळी यांना शिवसेना (उबाठा)च्या सायरा मुल्ला यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. एमआयएमचे खाजा बी. पठाण यांना 566 मते, काँग्रेसच्या जाकीराबी पठाण यांना 464 मते, अपक्ष सुप्रिया पाटील यांना 378 मते, तर प्रहारच्या संजीवनी बारंगुळे यांना 250 मते मिळाली. नगराध्यक्षपदासाठी NOTA ला 341 मते मिळाल्याची नोंद झाली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – विजयी उमेदवार

या पक्षाने विविध प्रभागांत वर्चस्व राखले असून विजयी उमेदवारांची नावे आणि त्यांना मिळालेली मते खालीलप्रमाणे आहेत:

  • प्रभाग १: चांगुना जाधव (१७४८), वसंत देवकर (१६८१)
  • प्रभाग ३: अनिकेत कारंडे (१५७१)
  • प्रभाग ६: नागेश अक्कलकोटे (२४३३), सायरा मुल्ला (२०७३)
  • प्रभाग ८: अमोल मांगडे (१९४६)
  • प्रभाग ९: भागवत ऊर्फ सचिन मांगडे (१२८४)
  • प्रभाग ११: नवनाथ माळगे (१०३४), शांता नायकोजी (२३५७)
  • प्रभाग १४: राहूल कोंढारे (१७४२)
  • प्रभाग १५: महेदीमियाँ लांडगे (१७२०), रागिणी पाचपुते (१३७१)
  • प्रभाग १६: आकाश राऊत (१८११), शिला साळुंखे (१७४२)
  • प्रभाग १९: विद्या बंगाळे (१७३१)
  • प्रभाग २०: सरस्वती भानवसे (२१८५), मुज्जमिल पठाण (१८८९)
  • प्रभाग २१: गोदावरी शिंदे (१४३०), कृष्णराज बारबोले (१४३७)

२. भाजप व शिवसेना (महायुती) – विजयी उमेदवार

महायुतीच्या उमेदवारांनीही अनेक प्रभागांत विजय मिळवला आहे:
  • प्रभाग २: अनिरुद्ध वाणी (१४८६), सुनीता ढोणे (१३८७)
  • प्रभाग ३: अर्चना बारस्कर (१५२०)
  • प्रभाग ४: अमोल चव्हाण (१९६१), उर्मिला मोहिते (१९१४)
  • प्रभाग ५: शमा रिकीबे (१३६७), राजू घोंगाने (१३८२)
  • प्रभाग ७: संदेश काकडे (३३६७)
  • प्रभाग ८: सुजाता मस्के (१७७०)
  • प्रभाग ९: आबेदा तांबोळी (१३७६)
  • प्रभाग १०: स्वप्निल उघडे (१६३७), उर्मिला मुळे (१७४३)
  • प्रभाग १२: भागीरथी त्रिंबके (१५७०), संतोष बारंगुळे (१७०३)
  • प्रभाग १३: फर्जना जलसे (२१४४), दीपक राऊत (२३८८)
  • प्रभाग १७: चंद्रकला कांबळे (१८१९), विजय चव्हाण (१८६२)
  • प्रभाग १८: रोहित पाटील (१६०९), कांचन मोहिते (१३७८)
  • प्रभाग १९: भारत पवार (१५२४)

Web Title: Bjp candidate tejaswini kathle wins the post of mayor at barshi local body election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 08:40 PM

Topics:  

  • Barshi
  • Maharashtra Politcs
  • Nagarparishad Election Result 2025

संबंधित बातम्या

Satara Municipal Election Results 2025: शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची रणनीती यशस्वी ,सात नगरपालिका भाजपच्या गोटात
1

Satara Municipal Election Results 2025: शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची रणनीती यशस्वी ,सात नगरपालिका भाजपच्या गोटात

Nagar Parishad Election result Update: सांगलीतील सत्ता संतुलन; बहुतांश आमदार यशस्वी, पण तासगावात बंडखोरीचा फटका
2

Nagar Parishad Election result Update: सांगलीतील सत्ता संतुलन; बहुतांश आमदार यशस्वी, पण तासगावात बंडखोरीचा फटका

Maharashtra Local Body Election Result 2025: आज ठरणार ‘नगरां’चे शिलेदार ! मतमोजणीकडे नजरा, राजकीय पक्षांचे दावे-प्रतिदावे
3

Maharashtra Local Body Election Result 2025: आज ठरणार ‘नगरां’चे शिलेदार ! मतमोजणीकडे नजरा, राजकीय पक्षांचे दावे-प्रतिदावे

Maharashtra Local Body Election Result 2025 Live: निवडणूकीत भाजपचा ‘धुरळा’, १२० उमेदवार नगराध्यक्षपदी
4

Maharashtra Local Body Election Result 2025 Live: निवडणूकीत भाजपचा ‘धुरळा’, १२० उमेदवार नगराध्यक्षपदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.