chandrashekhar bawankule on delhi assembly elections result 2025
मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपचा विजय झाला असून आम आदमी पक्षाला मोठा फटका बसला आहे. 27 वर्षानंतर भाजपला दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करता येणार आहे. दिल्लीमध्ये भाजपला 47 जागांवर विजय मिळाला आहे. तर 22 जागांवर आपला विजय मिळाला आहे. मात्र कॉंग्रेसला खाते देखील उघडता आलेले नाही. दिल्लीच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी म्हणून एकत्रितपणे लढले असते तर विजय मिळवता आला असता असे मत आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मांडले आहे. याचा भाजप नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
दिल्लीमध्ये कॉंग्रेसला मोठा फटका बसला आहे. सलग तिसऱ्यांदा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला धक्का बसला असून यावेळी कॉंग्रेस खाते देखील उघडता आलेले नाही. यावरुन आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेले आहे. याबाबत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. बावनकुळे म्हणाले की, २०४७ पर्यंत काँग्रेस हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. त
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिल्लीच्या निवडणुकीमधील विजयावर भाष्य केले. बावनकुळे म्हणाले की, “काँग्रेस पक्षाकडे कोणतंही मॉडेल नाही. कोणतीही निती नाही. काँग्रेसकडे कोणतीही नितिमत्ता नाही. जनता काँग्रेसला मते का देतील? त्यांच्याकडे कोणतीही योजना नाही. 2047 पर्यंत काँग्रेस हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. 2047 पर्यंत या देशात काँग्रेस निवडणूक जिंकू शकत नाही. कारण 2047 पर्यंत विकासाचा मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या संकल्पावर राष्ट्र पुढे चालणार आहे. जनता देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या संकल्पांना साथ देईल”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दिल्ली विधानसभेवर 27 वर्षांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोवला गेला आहे. दिल्लीच्या तमाम कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दिल्लीच्या जनतेने विश्वास ठेवला. या विजयाने आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे. सातत्याने खोटी आश्वासने देऊन, लोकांना भुलवून ज्या प्रकारे त्यांनी राज्य केले, त्या परंपरेचा आज अंत झाला आहे. खोटे राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या निवडणुकीच्या निकालाबाबत दिली आहे.