
BJP Chandrashekhar Bawankule viral video on Election Commission campaign Hishob Gadchiroli news
Chandrashekhar Bawankule viral video : ग़डचिरोली : सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नगर परिषद आणि नगर पंचायतच्या निवडणूका पार पडत आहेत. यासाठी जोरदार तयारी सुरु झाली असून प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. सर्वच राजकीय नेत्यांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे, मात्र सध्या भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे चर्चेत आले आहे. निवडणूक आयोगाला प्रचाराला देण्यात येणाऱ्या खर्चाबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच विरोधकांनी देखील भाजप आणि बावनकुळेंवर निशाणा साधला.
प्रचाराच्या सभेंमध्ये अनेकदा नेते उत्साहाच्या भरावर आश्चर्यकारक वक्तव्य करत असतात. यावेळी भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचाराच्या खर्चाची व्हिडिओ समोर आली आहे. गडचिरोलीमधील भाजप प्रचारक कार्यायलाच्या उद्घाटनप्रसंगी बावनकुळे उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधून उमेदवारांचे मनोबल वाढवले. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित जनतेशी संवाद साधत होते. यावेळी त्यांच्या लक्षात आले की सभेसाठी आलेल्या महिला या उन्हामध्ये बसल्या आहेत. यावेळी त्यांनी मंडप हा पूर्ण का नाही टाकला असा अर्थवट का टाकला याचा जाब आयोजकांना मंचावरुनच विचारला. यावेळी निवडणूक आयोगाला हिशोब द्यावा लागतो असे म्हणत बजेटचे कारण देत मंडप अर्धाच टाकल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. यावेळी पैशांची चिंता न करता मी स्टार प्रचारक आहे असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, माझ्या लाडक्या बहिणी उन्हामध्ये बसल्या आहेत. हिशोबाची काळजी करु नका. पेडॉल लावला तर ५० रुपये लावतील ना, हिशेबच द्यायचाय ना देऊ, मी स्टार प्रचारक आहे, कशाला हिशेब लागतोय, असे म्हणत राज्यात सत्तेत आहोत, देऊ हिशेब, असे वक्तव्य केले. या वक्तव्याची कार्यक्रमस्थळी चर्चा होती. या सभेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावरुन विरोधकांनी निशाणा साधला आहे.
हे बोलत असलेले गृहस्थ एके काळचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. सध्या हे राज्याचे महसूल मंत्री आहेत. नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छोट्या शहरांमध्ये मूलभूत लोकाभिमुख प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी माझ्याकडे चिक्कार पैसा आहे.. खर्चाची चिंता करू नका.. खर्च… pic.twitter.com/iCmTicULum — SushmaTai Andhare (@andharesushama) November 22, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
निवडणूक आयोगाला हिशोब द्यावा लागण्याच्या या वक्तव्याचा शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खरपूस समाचार घेतला. सुषमा अंधारे यांनी लिहिले की, हे बोलत असलेले गृहस्थ एके काळचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. सध्या हे राज्याचे महसूल मंत्री आहेत. नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छोट्या शहरांमध्ये मूलभूत लोकाभिमुख प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी माझ्याकडे चिक्कार पैसा आहे.. खर्चाची चिंता करू नका.. खर्च निवडणूक आयोगाला कसा द्यायचा ते मला कळतो अशी दर्पोक्ती करणारे हे महाशय निवडणूक आयोगाच्या कारवाईस पात्र ठरणार आहेत का ? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.