मुदखेड नगर पंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी असल्याने जोरदार लढत होणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Local Body Election : मुदखेड : मुदखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत यंदा अपक्ष उमेदवारांचा मोठा बोलबाला दिसून येत असून नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात असलेल्या १० उमेदवारांपैकी तब्बल ३ अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवत निवडणुकीची रंगत वाढवली आहे. तर १० प्रभागांमध्ये एकूण ८८ उमेदवार उभे असून त्यात १६ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. शेवटच्या दिवशी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली. छाननी, माघार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे रिंगण स्पष्ट झाले असून प्रमुख पक्षांसाठी अपक्षांचे उमेदवार हे मोठे ‘डिसायडिंग फैक्टर’ ठरणार, अशी चर्चा मतदारांत सुरू आहे.
नगराध्यक्ष पदावर अपक्षांची ताकद
नगराध्यक्षपदासाठी खालील अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत अनसारी सोफिया अंजुम अन्सारी मुजीब अहमद, गौसिया बेगम अब्दुल खय्यूम, बारतोंडे श्रद्धा केशवराव तसेच एमआयएमच्या हिना कौसर मोहम्मद अझिमोद्दीन यांनीही उमेदवारी कायम ठेवल्याने भाजप-काँग्रेसच्या मतांत मोठी विभागणी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. या अपक्ष उमेदवारांमुळे प्रमुख पक्षांचे विश्लेषण गुंतागुंतीचे बनले असून भाजपा-काँग्रेसच्या उमेदवारांत चिंतेचे वातावरण आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सर्वच पक्ष स्वबळावर – निवडणूक बहुरंगी
या निवडणुकीत ना युती, ना आघाडी, अशी स्थिती असून काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांनी सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाने) नगराध्यक्ष पदासह काही प्रभागांमध्ये उमेदवार दिले आहेत. त्यामुळे त्रिकोणीच नव्हे तर बहुकोनी लढत निर्माण झाली आहे.
कार्यकर्त्यांची नाराजी -अपक्ष म्हणून आव्हान
भाजपा व काँग्रेस या दोन्ही पक्षांतील काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट न मिळाल्याने नाराजी स्पष्ट झाली आहे. काहीजण शांत बसण्याचा निर्णय घेत असले, तरी अनेकांनी थेट अपक्ष उमेदवारी दाखल करून पक्ष नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
‘आप’चे उमेदवार परिवर्तनाच्या तयारीत
देगलूर : प्रभाग क्र. ८ मधील उमेदवार देगलूर (वा.) नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत लढत होणार आहे.
प्रभाग क्र. ८ व मध्ये परिवर्तनाचा मुद्य ठळकपणे पुढे येत असून आम आदमी पक्षाच्या उमेदवार सावित्री लक्ष्मीकांत कद्रेकर यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवाराशी त्यांची मुख्य लढत होणार असल्याचे स्थानिक पातळीवरील चर्चेतून स्पष्ट होत आहे.
सावित्री कद्रेकर यांनी मतदारांसमोर महिला सक्षमीकरण, मोफत आरोग्य तपासणी, मोफत इंग्रजी माध्यमातील शिक्षण, युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र, सरकारी योजनांसाठी एकखिडकी सुविधा, तसेच वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष मदतीची हमी असा गॅरंटी कार्ड जाहीर केला आहे.






