bjp Kirit Somaiya expressed his opinion on making rules on Bangladeshi infiltration
नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. यावरुन विरोधकांनी देखील टीकेची झोड उठवली आहे. तसेच ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते अमित शाह यांच्यावर टीका केली. यावरुन भाजप नेते व माजी खासदार किरिट सोमय्या यांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी मेळावा घेतला. यामध्ये त्यांनी आगामी निवडणुकांसाठी पदाधिकाऱ्यांना जोरदार तयारी करायला लावली. त्याचप्रमाणे भाजप नेत्यांवर देखील हल्लाबोल केला. यावरुन किरिट सोमय्या आक्रमक झाले आहे. सोमय्या म्हणाले की, “उध्दव ठाकरे यांनी अवस्था काय ते आरशात पाहिलं असत तर बरं झालं असतं. उरलेसुरलेले लोक दुसरीकडे जात आहे म्हणून यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. नाव गेलं निशाणी गेली आता नामोनिशान जात आहे. त्यामुळे माणूस तडफडतो त्याप्रमाणे उद्धव ठाकरे तडफडत आहे. नरेंद्र मोदी सरकारने कायदा आणला आहे जो कोणी हिंदू प्रदेशात राहत असेल तो भारतात आल्यावर त्याने हिंदू असल्याचे पुरावे दिले तर त्यास नागरिकत्व मिळणार,” असा दावा देखील किरिट सोमय्या यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यामध्ये बांगलादेशी घुसखोरी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अभिनेता सैफ अली खानचा हल्लेखोर देखील बांगदलादेशी घुसखोर असून एका घुसखोर महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे देखील समोर आले आहे. यावर किरिट सोमय्या म्हणाले की, “बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांना मान्यता देण्याचं काम काही अधिकारी आणि काही राजकीय नेते करत आहे. 2024 मध्ये 20 लाख बांगलादेशी रोहिग्यांनी महाराष्ट्रात अर्ज केले. या लोकांना जन्मपत्र देण्यासाठी राजकीय व स्थानिक नेत्यांनी दबाव आणले. यांना अनाधिकृत जन्म प्रमाणपत्र दिलं गेलं हे आता समोर येत आहे. अकोल्यात 3 वर्षांत 269 लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 2024 मध्ये वर्षभरात अकोला शहरात 4 हजार 849 अर्ज केले आणि त्यांना जन्म प्रमाणपत्र दिले जात आहे. यामुळे काल मालेगाव येथील तहसीलदार नायब तहसीलदार यांना निलंबित करण्यात आले आहे. यापुढे कठोर गाईडलाईन होत नाही तोपर्यंत कोणालाही जन्म प्रमाणपत्र दिले जाणार नाही. तसा मी मुख्यमंत्र्यांना आग्रह करणार आहे. स्थानिक राजकीय हितासाठी हा व्होट जिहाद आहे,” अशी गंभीर टीका किरिट सोमय्या यांनी केली आहे.
महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये एकतर्फी यश मिळाल्यानंतर देखील नेत्यांमध्ये वाद दिसून आला. मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि पालकमंत्रिपदावरुन महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजीनाट्य सुरु होते. तर महाविकास आघाडीमधील अनेक नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावर किरिट सोमय्या म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीत पानिपत झाल्याने हे तिघे एकत्र बसत नाही. म्हणुन तिथं राहिलेले काही चांगले कार्यकर्ते महायुती सरकार आणि चांगल्या कामासाठी इथे तिथे जातात 288 पैकी फक्त 48 आहे. चांगली माणसे कामासाठी कोणाचा आधार घेत असेल तर हरकत नाहीत. अमित शहा कठोर गृहमंत्री आहेत आणि सहकार मंत्री देखील आहे,” असे मत किरिट सोमय्या यांनी व्यक्त केले.