Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP Allegations on Kapil Sibal: ‘तो दावा निव्वळ मूर्खपणा’…; एपस्टीन प्रकरणावरून कपिल सिब्बल यांचा भाजपवर पलटवार

अमेरिकेतील कुप्रसिद्ध गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनशी संबंधित गोपनीय कागदपत्रे (Epstein Files) नुकतीच सार्वजनिक झाली आहेत. या फाईल्समध्ये काही भारतीय नावांचा उल्लेख आल्याने देशात मोठा राजकीय गदारोळ सुरू झाला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 15, 2026 | 10:29 AM
Jeffrey Epstein List India. Kapil Sibal Controversy, Political Allegations India

Jeffrey Epstein List India. Kapil Sibal Controversy, Political Allegations India

Follow Us
Follow Us:
  • सिब्बल यांना मिळालेल्या सन्मानावर भाजपने उपस्थित केले गंभीर प्रश्न.
  • हरदीपसिंग पुरींनंतर आता कपिल सिब्बल भाजपच्या रडारवर
  • अमेरिकेतील कुप्रसिद्ध गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनशी संबंधित गोपनीय कागदपत्रे नुकतीच सार्वजनिक झाली आहेत.
BJP Allegations on Kapil Sibal: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगभरात एपस्टिन प्रकरणाने धुमाकूळ घातला आहे. भारतीय राजकारणातही याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचेही नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे. यावरून भाजप चांगलीच अडचणीत सापडली आहे. अशातच आता भाजपने (BJP) माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. पण त्याचवेळी कपिल सिब्बल यांनी मात्र भाजपचे सर्व आरोप फेटाळून लावत जशास तसे उत्तरही दिले आहे.

Jay Pawar News: ‘Mom आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान’…; जय पवारांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

भाजपचा आरोप आणि कपिल सिब्बल यांचे प्रत्युत्तर

माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांना २०१० मध्ये अमेरिकेत झालेल्या एका कार्यक्रमात पुरस्कार मिळाला होता. या कार्यक्रमाला वैश्याव्यवसाय आणि लैंगिक गुन्हेगारीचे आरोप झालेल्या जेफ्री एपस्टिन ने निधी दिला होता. यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी भाजपने केली आहे.पण त्याचवेळी भाजपचे हे दावे मूर्खपणा असल्याचा पलटवार करत सिब्बल यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

काँग्रेसकडूनही (Congress) भाजपचे आरोप फेटाळून लावले आहे. सिब्बल त्या कार्यक्रमात एपस्टीनचे पाहुणे नव्हते. काँग्रेसचे मीडिया आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा म्हणाले की, ‘ सिब्बल त्यावेळी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री होते. शिक्षणात जागतिक सहकार्याकातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले होते. याचा जेफ्री एपस्टीनशी काहीही संबंध नाही.”

राज्यातील तब्बल दीड हजार पतसंस्था रडारवर; माहिती न दिल्याने आता होणार कारवाई

प्रदीप भंडारी यांचे आरोप

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये दावा केला आहे की, ”२०१० मध्ये तत्कालीन काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांना एपस्टाईनने निधी दिलेला पुरस्कार देण्यात आला होता. काँग्रेसच्या परदेशी युनिटचे प्रमुख सॅम पित्रोदा हे देखील “त्याच गटाशी” संबंधित होते. भंडारी यांनी ‘एक्स’ वरील एक कागदपत्र शेअर केले, ज्यामध्ये २०१० मध्ये न्यू यॉर्कमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार समारंभात पित्रोदा यांच्यासह इतर मान्यवरांच्या यादीत सिब्बल यांचे नाव समाविष्ट असल्याचा दावा केला होता.

दरम्यान, अमेरिकेतील कुप्रसिद्ध गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनशी संबंधित गोपनीय कागदपत्रे (Epstein Files) नुकतीच सार्वजनिक झाली आहेत. या फाईल्समध्ये काही भारतीय नावांचा उल्लेख आल्याने देशात मोठा राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. विशेषतः केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या नावावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

 

नेमका वाद काय?

अमेरिकेच्या न्याय विभागाने जारी केलेल्या कागदपत्रांमध्ये हरदीप सिंग पुरी यांचे नाव समोर आल्यानंतर, काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “ज्या व्यक्तीचे नाव अशा गंभीर प्रकरणाशी जोडले गेले आहे, तिला पदावर राहण्याचा अधिकार नाही,” असे काँग्रेसने म्हटले आहे. मंत्री हरदीप पुरी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “माझे एपस्टाईनशी असलेले संबंध केवळ व्यावसायिक (Professional) स्वरूपाचे होते. मी संयुक्त राष्ट्रात भारताचा राजदूत असताना काही अधिकृत शिष्टमंडळाचा भाग म्हणून त्याला ३-४ वेळा भेटलो होतो. त्याचा माझ्या वैयक्तिक किंवा कोणत्याही गुन्हेगारी कृत्याशी संबंध नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांच्या आरोपांना त्यांनी ‘बालिशपणा’ असे संबोधले आहे.

 

Web Title: That claim is pure nonsense kapil sibal hits back at bjp over epstein case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 10:29 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Jeffrey Epstein
  • National Politics

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
2

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
3

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
4

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.