Disha Salian Case News bjp nitesh rane press conference targets aditya thackeray
मुंबई : औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे नागपूरमध्ये दंगल झाली. यामध्ये जमावाने मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि दगडफेक केली. यामध्ये पोलीस दलावर देखील दगडफेक करण्यात आली असून यामध्ये 34 पोलीस जखमी झाले आहेत. त्याचबरोबर सामान्य लोकांच्या गाड्या फोडण्यात आल्या यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, या दंगलीमुळे मंत्री नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून जोरदार हल्लाबोल केला आहे.
मंत्री नितेश राणे यांनी विधीमंडळाच्या आवारामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नागपूरमध्ये जी दंगल झाली त्याची सर्व माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. नागपूरमध्ये बजरंग दल आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले. दुपारी आंदोलन थांबवून सगळं मिटले होते. मात्र रात्री हा प्रकार झाला. नंतर काही आंदोलक आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आले. त्यामुळे हा सगळा प्रकार हा पूर्वनियोजित होता असं वाटत आहे. काही गोष्टी या मुद्दाम ठरवून केल्यासारख्या वाटत आहेत. या भागामध्ये मुद्दाम दंगल घडवायची का? असा प्लॅन होता का? याची चौकशी केली जाणार आहे. तुम्ही कोणीही याल आणि काहीही आमच्या राज्यात कराल तर ते सोप राहिलेलं नाहीये.” असे मत मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नागपूर दंगलीमध्ये पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आला. यामध्ये 34 पोलीस जखमी झाले. याबाबत नितेश राणे म्हणाले की, “पोलीस बांधवांवर देखील मोठ्या प्रमाणात हल्ला करण्यात आला. याबद्दल कोणत्या संविधानामध्ये लिहिले आहे? पोलीस खात हे राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अथक प्रयत्न करत असते. दंगल शांत करण्यासाठी आमचं पोलीस खात तिथे उपस्थित होतं. त्यांच्यावर हल्ला करण्याचं काय कारण आहे? त्यांच्यावर कशाला हल्ला केला? एखादा आमचा DCP लेव्हलच्या पोलिसांवर कुऱ्याडीने हल्ला केला आहे. ही अशा पद्धतीची आंदोलन कोणत्या चौकटीमध्ये केली जातात. पोलिसांवर हल्ला केल्यानंतर आमचं सरकार गप्प कसं बसेल. पाकिस्तानाचा अब्बा लक्षात येईल अशी कारवाई केली जाईल,” असा घणाघात मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे नितेश राणे म्हणाले की, “या राज्यामध्ये औरंगजेबाच्या कबर काढून टाकण्यासाठी आंदोलन करणं हा काय गुन्हा आहे का? सकाळी केलेल्या आंदोलनाचा यांना एवढा राग का आला? यामध्ये आंदोलना उत्तर देण्यासाठी यांनी पोलिसांवर हल्ला केला. रस्त्यावर ट्रकभर दगड कशी काय आली? ती आणण्यामागे कोणाचे काय उद्दिष्ट्य होते? असे अनेक सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर नागपूरमध्ये एका भागामध्ये एका विशिष्ट्य धर्माचे लोक रोज गाड्या पार्किंग करतात काल मात्र हे पार्किंग करण्यात आले नव्हते. म्हणजे हे सर्व पूर्वनियोजित करण्यात आले आहे,” असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.