Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“काँग्रेसचा इतिहासच ओबीसींच्या विश्वासघाताचा…अहवाल कुजवले; भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा घणाघात

Keshav Upadhyay Marathi News : भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी माध्यमांशी संवाद साधून आरक्षणाच्या मुद्द्यावरुन कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 08, 2025 | 05:33 PM
BJP spokesperson Keshav Upadhyay, targeted Congress on issue of reservation in maharashtra

BJP spokesperson Keshav Upadhyay, targeted Congress on issue of reservation in maharashtra

Follow Us
Close
Follow Us:

Keshav Upadhyay on Reservation : पुणे : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आंदोलन केले. ऐन गणेशोत्सवामध्ये मराठा नेते जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आंदोलन केले. यानंतर राज्य सरकारकडून जरांगे पाटील यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. याबाबत जीआर देखील काढण्यात आला. यानंतर काही कॉंग्रेस नेत्यांनी राज्य सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. या मागण्या मान्य केल्यामुळे ओबीसी समाजाचे नुकसान झाले असल्याचा दावा कॉंग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यावर भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मंडल आयोग, कालेलकर आयोगाचे अहवाल काँग्रेसच्या सरकारांनी कुजवले असा घणाघात केशव उपाध्ये यांनी केला आहे.

कॉंग्रेसवर टीका करताना भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, ओबीसी समाजाची बाजू घेण्याचा आव आणणाऱ्या काँग्रेसचा इतिहास ओबीसी समाजाच्या विश्वासघाताने बरबटलेला आहे. मंडल आयोगाचा आणि त्यापूर्वी काका कालेलकर आयोगाचा ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठीचा अहवाल काँग्रेसच्या सरकारांनी कुजवून टाकला, असा घणाघात केशव उपाध्ये यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरक्षणावरुन टीका करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. ओबीसी समाजाच्या कल्याणाला विरोध करणारे काँग्रेसचे राहुल गांधी, विजय वडेट्टीवार यांच्यासारखे नेते आज ओबीसी समाजाला भडकवण्याचे पाप करीत आहेत असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

मंडल आयोगाबाबत भाष्य करताना भाजप नेते केशव उपाध्ये म्हणाले की,  “मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला काँग्रेसचे त्यावेळचे अध्यक्ष राजीव गांधी यांनी 6 सप्टेंबर 1990 रोजी लोकसभेत केलेल्या भाषणात विरोध दर्शविला होता. काँग्रेसच्या ओबीसी विरोधी इतिहासाचे वेगवेगळे दाखले देते. 1955 मध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी काका कालेलकर आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती. या आयोगाचा अहवाल त्यावेळच्या काँग्रेस सरकारने मंत्रिमंडळ बैठकीपुढे आणलाच नाही. हा अहवाल धूळ खात कुजवत ठेवण्याचे पाप काँग्रेसने केले. मंडल आयोगाबाबत काँग्रेसने याच पद्धतीचे राजकारण केले. मंडल आयोगाच्या शिफारशी इंदिरा गांधी आणि नंतर राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना कधीच अंमलात आणल्या नाहीत. हे दोन्ही अहवाल कुजवत ठेवून काँग्रेसने आपण ओबीसींचे विरोधक आहोत हेच दाखवून दिले होते. त्यावेळी शरद पवार हे काँग्रेस मध्येच होते. त्यांनीही काँग्रेसचे ओबीसी विरोधी राजकारण मुकाटपणे सहन केले,’ याची आठवणही केशव उपाध्ये यांनी करून देत कॉंग्रेस नेते आणि शरद पवारांवर देखील टीकास्त्र डागले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ओबीसी समाजाची बाजू घेत भाजप नेते केशव उपाध्ये म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने सुरुवातीपासूनच ओबीसी समाजाच्या विकासाचा आग्रह धरला आहे. मंडल आयोगाची अंमलबजावणी भाजपाचा पाठिंबा असलेल्या व्ही. पी. सिंग सरकारने केली. मोदी सरकारच्या काळातच ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला गेला, अशी भूमिका केशव उपाध्ये यांनी मांडली आहे.

Web Title: Bjp spokesperson keshav upadhyay targeted congress on issue of reservation in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 05:31 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Maratha Reservation
  • OBC Reservation

संबंधित बातम्या

मोठी बातमी! आरक्षणाचा मुद्दा तापणार; ‘हा’ समाज आंदोलनाच्या तयारीत, सरकारची डोकेदुखी वाढणार?
1

मोठी बातमी! आरक्षणाचा मुद्दा तापणार; ‘हा’ समाज आंदोलनाच्या तयारीत, सरकारची डोकेदुखी वाढणार?

मराठा आरक्षणाचा मार्ग नाही सोपा; नव्या GR विरोधात ओबीसी नेते छगन भुजबळ जाणार कोर्टात
2

मराठा आरक्षणाचा मार्ग नाही सोपा; नव्या GR विरोधात ओबीसी नेते छगन भुजबळ जाणार कोर्टात

Eknath Shinde News: फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्हाला भाजपने बाजूला केलयं का? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर
3

Eknath Shinde News: फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्हाला भाजपने बाजूला केलयं का? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर

17 सप्टेंबरच्या आत निर्णय घ्या, नाहीतर…; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4

17 सप्टेंबरच्या आत निर्णय घ्या, नाहीतर…; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.