
BJP state president Ravindra Chavan's suggestive statement about the break with mahayuti
Ravindra Chavan : मुंबई : मागील अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. महायुतीमधील घटक पक्षांमध्ये वाद निर्माण होत आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये वाद निर्माण झाला आहे, शिंदे गटातील अनेक नेते आणि कार्यकर्ते हे भाजप पक्षामध्ये प्रवेश करत असल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी दिल्ली वारी करत अमित शाहांकडे तक्रार केल्याचे देखील बोलले जात आहे. दरम्यान, भाजपच्या आणि मित्रपक्षातील या वादावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सूचक वक्तव्य केले. मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
कोकणात शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड घालत लाखो रुपयांची कॅश असल्याचे दाखूवन दिले. तसेच मराठवाड्यात शिंदे सेनेचे आमदार संजय बांगर यांच्या घरी भल्या पहाटे 100 पोलिसांनी छापा घातल्याचा दावा करण्यात येत आहे. दोन्ही पक्षातील राजकीय वाद विकोपाला गेले आहेत. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याने वादाची ठिणगी पडली आहे.
नितेश विरुद्ध निलेश! मालवण कॅश प्रकरणावरुन राणे बंधूंमध्ये पेटलं वाकयुद्ध
महायुतीमधील अंतर्गत वाद आणि पैशांची सापडलेली बॅग तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी याबाबत माध्यमांनी रवींद्र चव्हाण यांना प्रश्न केला. याबाबत त्यांनी अतिशय सूचक असे वक्तव्य केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, “मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. याबद्दल नंतर बोलेन.ते खोटे बोलत आहेत.” असे सूचक विधान रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. त्याचबरोबर महायुतीमध्ये अतंर्गत वाद सुरु असल्याचे देखील समोर आले आहे.
नवनीत राणा पुन्हा कडाडल्या! धर्म अन् अयोध्येवर टीका करणाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
चाळीसगावमध्ये प्रचाराला आले असताना रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळामध्ये भडका उडण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी मालवणमध्ये स्टिंग ऑपरेशन केले. त्यांनी पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला. त्यावर चव्हाण यांनी सूचक इशारा दिला. मला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे. त्यानंतर मी निलेश राणे यांच्या आरोपांना उत्तर देईन. आत्ता मी काहीही बोलणार नाही. नंतर उत्तर देईन. निलेश राणे जे बोलत आहेत ते खोटं आहे, असे चव्हाण म्हणाले. त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला असल्याचे दिसून येत आहे.