मालवणमध्ये पैशांची बॅग सापडल्यानंतर नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरु आहे (फोटो - सोशल मीडिया)
Nilesh Rane Sting Operation : मालवण : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा रणसंग्राम रंगला आहे. मात्र त्यापूर्वी कोकणामध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. महायुतीमधील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकत तब्बल 25 लाख रुपयांची रोकड जप्त केली. यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. निलेश राणे यांनी याबाबत निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. या पैशांचा वापर निवडणुकीमध्ये केला जाणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. या प्रकरणी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे मालवण प्रकरणात दोन्ही राणे बंधूंचे एकमेकांवर जोरदार वाकयुद्ध सुरु असल्याचे दिसत आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी काल थेट मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी धाड टाकली. निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी पोहोचले. यावेळी निलेश राणेंना विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी अवैध आणि हिशोबी नसलेली मोठी रोख रक्कम आढळून आली आहे. यामुळे मालवणच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. यावर किंजवडेकर यांनी ही रक्कम बिजनेसची असून घराचे बांधकाम सुरु असल्याने लागत असल्याचे देखील सांगितले आहे. यावरुन पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.
बंद दाराआड सापडल्या पैशांनी खचाखच भरलेल्या बॅगा; निलेश राणेंनी भाजप नेत्याच्या घरी टाकली धाड
हे पैसे व्यवसायाचे असल्याचे म्हटल्याने निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने कसलीही भूमिका घेतलेली नाही. एफ आय आर देखील झालेली नाही. त्यावर संबंधित आरोपी सांगत आहेत की त्या बागेत त्यांच्या व्यवसायाचे पैसे होते, जर व्यवसायाचे पैसे होते तर तिथेच ते पैसे कुठून आले हे पटकन सांगायला पाहिजे होतं, त्या व्यक्तीचं नाव आणि झालेला व्यवहार हा जागेवर सांगायला हवा होता, इन्कम टॅक्स एन्ट्री, जीएसटी नंबर या सगळ्या बाबत खुलासे करावे लागणार. नुसतं तो पैसा व्यवसायातला होता सांगून होणार नाही पुरावे सादर करावे लागतील, अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी घेतली आहे.
नवनीत राणा पुन्हा कडाडल्या! धर्म अन् अयोध्येवर टीका करणाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
तर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी विजय केनवडीकर यांची बाजू सावरली आहे. ते म्हणाले की, त्यांच्याकडून अशाप्रकारची कोणतंही कृत्य होत नाही. भाजपला अशा पद्धतीने निवडणूक लढवण्याची काहीही गरज नाही. आमच्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखं नेतृत्व आहे, आमच्याकडे फडणवीस साहेबांसारखे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आम्ही विकास, सरकारी योजनांवर निवडणूक लढवत आहोत. हा जो काही प्रकार घडला त्याबाबत राज्य निवडणूक आयोग आणि पोलीस खात्याच्या चौकशीतून उलगडा होईल. ज्याच्या घरातून हे सापडलं त्याचा व्यवसाय आणि पार्श्वभूमी आपण लक्षात घेणार आहोत की नाही? पोलीस याप्रकरणाी नि:पक्षपातीपणे आणि पारदर्शक पद्धतीने या सगळ्याची चौकशी करतील. असेही मंत्री नेते नितेश राणे म्हणाले आहेत. त्यामुळे मालवण प्रकरणामुळे राणे कुटुंबामध्येच वाद निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे.






